शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या कसारा घाटात पडले महाकाय खड्डे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 07:46 IST

मुंबई-नाशिक प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांना महामार्ग पोलीस घोटी केंद्र व आपत्ती व्यवस्थापन टीमतर्फे रस्त्याच्या उजव्या बाजूने एकेरी बाजूने वाहने घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या जात हाेत्या

कसारा :  मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटात आंबा पाॅइंटजवळ दोन महिन्यांपूर्वी रस्त्याला तडे गेले होते. त्यावेळी ठेकेदाराने या रस्त्यावर खडी-डांबराचे अस्तर लावून हा रस्ता दुरुस्त केला हाेता. मात्र, हे काम निकृष्ट झाल्याने जाेरदार पावसाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व टोल कंपनीच्या या कामाची पाेलखाेल केली आहे. या ठिकाणचे डांबर निघून येथे आठ ते १० फुटांचे लांब खड्डे पडले आहेत. 

मुंबई-नाशिक प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांना महामार्ग पोलीस घोटी केंद्र व आपत्ती व्यवस्थापन टीमतर्फे रस्त्याच्या उजव्या बाजूने एकेरी बाजूने वाहने घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या जात हाेत्या. जव्हारकडून येणाऱ्या वाहनांनाही ओव्हरटेक न करता घाट उतरण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. दरम्यान, जुन्या घाटात रस्त्याला तडा गेल्याने या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी वाहनचालक करत आहेत.

कसारा घाटात तीन तास रखडपट्टी

कसारा : वीकेंडला फिरायला निघालेल्या पर्यटक आणि वाहनचालकांसाठी रविवारचा दिवस तापदायक ठरला. मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटातील माेठमाेठे खड्डे, रस्त्याची कामे आणि काही ठिकाणी बंद पडलेल्या वाहनांनी हा रस्ताच अडवून धरल्यामुळे प्रवाशांना कसारा ते कसारा घाट हे १५ मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी तीन तास लागले. त्यातच जाेरदार पाऊस आणि खड्ड्यांमुळे मदतकार्यात अडथळे येत असल्याने आणखीनच हाल झाले. त्यामुळे वाहनांच्या भल्यामाेठ्या रांगा लागल्या हाेत्या.   

मुंबई-नाशिक महामार्गांवरील कसारा बायपास ते वाशाळा फाटादरम्यान रविवारी सकाळी रस्त्याच्या मध्यभागीच ट्रक बंद पडला हाेता. त्यापुढे काही अंतरावर आणखी एका ट्रकचा एक्सेल पार्ट तुटल्याने तोही रस्त्यात उभा हाेता. वाशाळा फाटा येथे रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे. त्यामुळे नाशिककडे जाणारी वाहतूक पूर्णतः  विस्कळीत झाली होती. महामार्गांवर वाहतूककोंडी साेडवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन टीम, महामार्ग पोलीस शहापूर केंद्र आणि कसारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बंद पडलेली वाहने क्रेनच्या मदतीने बाजूला केली. त्यानंतर एकेरी वाहतूक सुरू करून तब्बल तीन तासांनी नाशिक लेनवरील वाहतूक कोंडी सोडविली. याचदरम्यान सकाळी १०.३० वाजता जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ एका वळणावर कंटेनर रस्त्यालगतच्या नाल्यात उतरल्याने जुन्या कसारा घाटातून नाशिककडे जाणारी वाहतूक पूर्णत: ठप्प झाली. महामार्ग पोलीस घोटी केंद्रच्या कर्मचाऱ्यांनी या घाटातील वाहतूक नवीन कसारा घाटातून नाशिक-मुंबई व मुंबई-नाशिक अशी फिरवली. त्यानंतर नाल्यात उतरलेला कंटेनर क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. त्यानंतर जुन्या कसारा घाटातून नाशिककडे जाणारी वाहतूक पूर्ववत करण्यात आली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई