शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

घोट नदीत कार पलटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 01:49 IST

मुसळधार पावसामुळे तळोजामधील घोट नदीमध्ये सोमवारी दुपारी कार नदीमध्ये कोसळली.

- शैलेश चव्हाण तळोजा : मुसळधार पावसामुळे तळोजामधील घोट नदीमध्ये सोमवारी दुपारी कार नदीमध्ये कोसळली. नदीमधून वाहत जाणारी कार व चार प्रवाशांना घोटमधील ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून वाचविले. दोरखंड व जेसीबीच्या साहाय्याने सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून ग्रामस्थांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दुर्घटनाग्रस्त शेख कुटुंबीयांनीही काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, अशी प्रतिक्रिया देत ग्रामस्थांनी मृत्यूच्या दाढेतून वाचविल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.पनवेलमधील वावंजे गावामध्ये राहणारे अशरफ खलील शेख (३७) कुटुंबीयांसह कारमधून (एमएच ०२ सीबी ११४९) तळोजा फेज १ कडे जात होते. घोटगावाजवळील नदीच्या पुलावर आले असता त्यांना मुसळधार पावसामुळे रोडचा अंदाज आला नाही व कार नदीमध्ये कोसळली. कारमध्ये अशरफ यांच्याबरोबर त्यांची पत्नी हमीदा शेख (३३), मुलगी सहाणा शेख (७) व पुतणी नमीरा रहमतउल्ला शेख (१७) होते. नदीत पडलेली कार प्रवाहाबरोबर वाहू लागली. खडकावर आदळून कारची काचही फुटली. गाडी अडकून राहिली. ही काच फुटल्यानंतर अशरफ शेख हे गाडीच्या बाहेर आले व लगेच पाण्याबाहेर जाऊन मदत मागितली. येथील रहिवासी लक्ष्मण धुमाळ ऊर्फ बाळा,लहू नारायण पाटील, तुळशीराम बळीराम निघुकर, रूपेश रामा पाटील, ज्ञानेश्वर पाटील, शिवाजी गोंधळी व इतर नागरिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. नागरिकांनी पाण्यात उडी घेवून दोरखंड कारला बांधला. जेसीबीच्या साहाय्याने कार बाहेर ओढण्यात आली.कारमधील नागरिक जीव वाचविण्यासाठी कारच्या टपावर बसले होते. अखेर कारसह चारही प्रवाशांना वाचविण्यात यश आले आहे.>मुसळधार पावसामुळे रस्त्याचा अंदाज आला नाही व कार नदीमध्ये कोसळली. कार वाहू लागल्यामुळे काळजाचा ठोका चुकला होता. ग्रामस्थ देवदूतासारखे धावून आले व जीव धोक्यात घालून आमचे प्राण वाचविले.- अशरफ शेख,दुर्घटनाग्रस्त कार चालक

टॅग्स :Accidentअपघात