शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

घारापुरी बेटाची अर्थव्यवस्था ठप्प, २३० कुटुंबीयांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 23:43 IST

रोजगाराचा एकमेव मार्गच बंद झाल्यामुळे रहिवासी संकटात असून, पर्यटन हंगाम पूर्ववत होण्याची वाट सर्वजण पहात आहेत.

मधुकर ठाकूरउरण : जागतिक वारसास्थळ असलेल्या घारापुरी (एलिफंटा) बेटावर पाच महिन्यांपासून पर्यटकांना बंदी घातली आहे. यामुळे येथील तीन गावांमधील अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली असून, २३० कुटुंबांना त्याचा फटका बसला आहे. रोजगाराचा एकमेव मार्गच बंद झाल्यामुळे रहिवासी संकटात असून, पर्यटन हंगाम पूर्ववत होण्याची वाट सर्वजण पहात आहेत.राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांमध्ये घारापुरी बेटांचा समावेश आहे. प्रत्येक वर्षी जवळपास १० लाख पर्यटक येथील लेण्या पाहण्यासाठी येतात. येथील लेण्यांना युनिस्कोने १९८७ मध्ये जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला आहे. घारापुरी बेटावर शेतबंदर, राजबंदर व मोराबंदर ही तीन मूळ गावे असून, त्यांची लोकसंख्या जवळपास १,२०० आहे. या गावांमध्ये २३० कुटुंब असून, बहुतांश कुटुंबीयांचा उदरनिर्वाह पर्यटन व्यवसायावरच होत आहे. मुंबईमधील गेट वे आॅफ इंडिया येथून बेटावर पर्यटकांना घेऊन जाण्यासाठी जवळपास १०० प्रवासी बोटी असून, त्यांच्यावर १,५०० नागरिक काम करत आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे सुरक्षेसाठी १८ मार्चपासून बेट पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. पाच महिन्यांपासून ही बंदी कायम असल्यामुळे बेटावरील नागरिकांची आर्थिक कोंडी झाली आहे. उत्पन्नाचा एकमेव प्रमुख मार्गच बंद झाला आहे. पहिल्यांदाच घारापुरी बेट एवढ्या प्रदीर्घ काळ बंद राहिले आहे. रहिवाशांना आर्थिक चणचण भासू लागली आहे. ग्रामपंचायतीने व शासनाच्या वतीने आलेले धान्य यापूर्वी रहिवाशांना देण्यात आले आहे, परंतु ही मदत अपुरी पडत आहे.घारापुरी बेटावरील लेणी नवव्या ते तेराव्या शतकामधील आहेत. मुख्य गुहा जवळपास २७ मीटर आकाराची असून, त्यामध्ये जगप्रसिद्ध त्रिमूर्तीचे शिल्प आहे. याशिवाय अर्धनारी नटेश्वर शिवाची पाच मीटर उंचीची मूर्ती, रावणानुग्रहमूर्ती, अंधकासुर वधमूर्ती, चार मीटर उंचीचे नटराज शिव शिल्प, शंकराने गंगा पृथ्वीवर आणली, यावर आधारित शिल्पाकृती व इतर अनेक प्रसंग दाखविणारे शिल्प येथील खडकांमध्ये कोरले आहेत. बेटाच्या माथ्यावर दोन भव्य तोफा असून, देशात आढळणाऱ्या मोठ्या तोफांपैकी या दोन तोफाही आहेत. समुद्राच्या मध्यभागी असणारे हे बेट पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असून, पाच महिने बंद असलेले बेट कधी खुले होणार, याकडे बेटावरील रहिवाशांसह पर्यटकांचेही लक्ष लागले आहे.>लॉकडाऊनमुळे बेटावरील सर्व व्यवसाय ठप्प आहेत. ग्रामपंचायतीच्या व शासनाच्या माध्यमातून ग्रामस्थांना अन्नधान्याचे वाटप केले होते. मदतीसाठी अनेक प्रकल्प चालकांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे, परंतु संंंबंधितांकडून अद्याप मदत मिळालेली नाही.- बळीराम ठाकूर, सरपंच