शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

घणसोलीकर महानगरपालिका रुग्णालयाच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 02:01 IST

Navi Mumbai News : पालिकेच्या वतीने घणसोली येथे आरक्षित असलेला रुग्णालयाचा भूखंड धूळ खात पडून आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात विभागनिहाय रुग्णालयांची आवश्यकता निर्माण झाली आहे.

नवी मुंबई : पालिकेच्या वतीने घणसोली येथे आरक्षित असलेला रुग्णालयाचा भूखंड धूळ खात पडून आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात विभागनिहाय रुग्णालयांची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून कागदोपत्री मंजूर असलेले रुग्णालय प्रत्यक्षात उतरावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.शहरात कोरोना पसरत असताना, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेची रुग्णालये उपयुक्त ठरली आहेत. सर्वसामान्यांच्या खिशाला पालिकेचा उपचार परवडणारा असल्याने, अनेक जण कोरोनावर पालिकेच्या रुग्णालयातच उपचार घेतला आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयांचे महत्त्व दिसून आल्याने, विभागनिहाय रुग्णालयांची आवश्यकता भासत आहे. तसे झाल्यास खासगी रुग्णालयांकडून होणारी आर्थिक पिळवणूक थांबू शकते. त्याच भावनेतून घणसोली कॉलनी परिसरातही पालिकेचे रुग्णालय उभारण्याची मागणी होत आहे. त्यासाठी आरक्षित असलेला भूखंड वापरात आणावा, अशीही मागणी होत आहे.घणसोली सिम्प्लेक्स व घरोंदा परिसरात मध्यमवर्गीय व माथाडी कामगारांच्या कुटुंबीयांचे वास्तव्य आहे. त्या ठिकाणी पालिकेचे रुग्णालय नसल्याने त्यांना वाशी अथवा ऐरोलीला जावे लागत आहे, अथवा खासगी रुग्णालयाची पायरी चढून खिसा रिकामा करावा लागत आहे. मात्र, पालिकेचे रुग्णालय झाल्यास परिसरातल्या नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आधार मिळू शकतो. सध्या घणसोली गाव येथे कार्यरत असलेल्या आरोग्य केंद्राची जागा अपुरी पडत आहे. यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांसह चाचणीसाठी जाणाऱ्या रुग्णांचीही गैरसोय होत आहे. यामुळे स्वतंत्र जागी आरोग्य केंद्र अथवा रुग्णालय झाल्यास वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह नागरिकांनाही उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे पालिकेमार्फत लवकरात लवकर रुग्णालयासाठी राखीव भूखंड वापरात आणावा, अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका