शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

झिरो गार्बेजच्या ठरावाला सर्वसाधारण सभेची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 02:52 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात स्वच्छतेबाबत विविध उपक्रमांतून जनजागृती करण्यात येत असून, सर्व शासकीय कार्यालये, लोकप्रतिनिधींमार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.

वैभव गायकर पनवेल : स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात स्वच्छतेबाबत विविध उपक्रमांतून जनजागृती करण्यात येत असून, सर्व शासकीय कार्यालये, लोकप्रतिनिधींमार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर पनवेल महापालिकेने झिरो गार्बेज संकल्पना राबविण्याचा निश्चय केला असून याकरिता नुकताच याबाबतचा ठराव पनवेल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात आला.सद्यस्थितीत घनकचरा व्यवस्थापन ही पालिकेसह सर्वच व्यवस्थापनाला न झेपणारी अशी बाब आहे. याकरिता लागणारे मनुष्यबळ तसेच आर्थिक बाजूचा विचार केल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक भार हा संबंधित प्रशासनाच्या तिजोरीवर पडत असतो आहे. यासंदर्भात योग्य नियोजन व जनजागृती केल्यास घनकचरा व्यवस्थापनाचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. या गोष्टीला पर्याय म्हणून झिरो गार्बेज संकल्पना पुढे आली आहे. नुकताच पनवेल महापालिकेनेही यासंदर्भात ठराव मंजूर करून स्वच्छतेच्या बाबतीत एक पाऊल पुढे टाकले आहे.पनवेल महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात कचराकुंड्या ठेवण्यात आलेल्या आहेत. या कुंड्यामुळे रस्त्यावर अस्वच्छता निर्माण होतेच, त्याचबरोबर रहदारीलाही अडथळा निर्माण होतो. घनकचरा व्यवस्थापनात हा एक प्रकारे अडथळा आहे. त्यामुळे आगामी काळात पनवेल महापालिका कचराकुंड्यामुक्त करण्याचा संकल्प प्रशासनाचा आहे.पनवेल शहरात ओल्या-सुक्या कचºयाचे वर्गीकरण करण्यात येत नाही. एकंदरच महापालिका क्षेत्रात या कचराकुंड्या व्यवस्थापन बिघडत असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजन सुरू आहे. त्याकरिता मायक्र ो प्लानिंग सुरू असून, कचराकुंड्यांना थारा देण्यात आला नसल्याचे समजते. ओला कचरा आणि सुका कचरा वर्गीकरणाची सवय सोसायट्यांना लावण्यात येणार आहे. त्याचबरोबर ओला कचरा त्याच ठिकाणी जिरविण्याचे नियोजनसुद्धा सुरू आहे. तसेच यासंदर्भात झिरो गार्बेज या संकल्पनेनुसार पालिकेने ठराव मंजूर केल्याने घनकचरा व्यवस्थापनाला गती प्राप्त होणार आहे. यासंदर्भात पनवेल महापालिकेचे नगरसेवक हरेश केणी यांनी सर्वप्रथम सभागृहात आवाज उठवला होता. झिरो गार्बेज संकल्पनेनुसार त्यांनी तळोजा फेज वनमध्ये पहिल्यांदा संकल्पना राबविली आहे.घनकचरामुक्त तळोजा शहर ही मोहीम ते सध्या राबवत असून, त्याच धर्तीवर पालिकेने केलेला झिरो गार्बेजचा ठराव महत्त्वपूर्ण मानला जात आहे.>काय आहे झिरोगार्बेज संकल्पनाकचरा ज्या ठिकाणी निर्माण होतो, त्याच ठिकाणी त्या कचºयाचे विघटन करणे म्हणजेच झिरो गार्बेज. या व्यतिरिक्त ओल्या, सुक्या कचºयाचे एकाच जागेवर वर्गीकरण केल्यास पुढील घनकचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया सोपी होते.वेंगुर्ले नगरपरिषदेच्या पाहणी दौºयाची मागणीकोकणातील वेंगुर्ले नगरपरिषदेने झिरो गार्बेज ही संकल्पना सत्यात उतरवली आहे. कचºयापासून मिथेन, विविध प्रकारची खते, बायोगॅस, प्लास्टिकपासून रस्ते अशा प्रकारच्या अनेक संकल्पना नगरपरिषदेने सत्यात उतरविल्या आहेत.याच धर्तीवर पनवेल शहराचा कायापालट होऊ शकतो. त्यामुळे पनवेल महापालिकेच्या नगरसेवकांचा वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीत अभ्यास दौरा आयोजित करण्याची मागणी शेकाप नगरसेवक हरेश केणी यांनी पालिकेकडे केली आहे.>झिरो गार्बेज संकल्पना ही स्वच्छ भारत अभियानाचाच एक भाग आहे. याकरिता महापालिका विविध उपाययोजना राबविणार आहे. पालिका हद्दीतील नागरिकांनी याबाबत पुढाकार घेणे गरजेचे आहे. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात आपल्या सवयीत बदल करणे गरजेचे आहे. आपला परिसर स्वच्छ, सुंदर होण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावल्यास झिरो गार्बेज संकल्पना सत्यात उतरेल.- जमीर लेंगरेकर, उपायुक्त,पनवेल महानगरपालिका