शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सायन महामार्गावर वाहतूककोंडी, उरण फाटा येथे गॅसचा टँकर पलटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 05:08 IST

सायन-पनवेल मार्गावर उरण फाटा येथे गॅस टँकर पलटल्याची घटना बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये कोणीही गंभीर जखमी झालेले नाही.

नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावर उरण फाटा येथे गॅस टँकर पलटल्याची घटना बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. मात्र, अपघातग्रस्त गॅस टँकर मार्गावरच पडून राहिल्याने दुपारपर्यंत सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.एलपीजी गॅस कंपनीचा टँकर पुण्याच्या दिशेने जात असताना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. उरण फाटा पुलाच्या सुरुवातीला चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर दुभाजकाला धडकून पटली झाला. या वेळी टँकरमध्ये चालकासह इतर एक जण होता. अपघातामध्ये चालकाला किरकोळ दुखापत झाली असून, सुदैवाने जीवितहानी टळली आहे. मात्र, टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात गॅस भरलेला असल्याने त्याची गळती झाल्यास मोठ्या दुर्घटनेची शक्यता होती. त्यामुळे उरण फाटा पुलावरील वाहतूक पुलाखालून वळवण्यात आली होती. त्यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. हा अपघातग्रस्त टँकर दुपारपर्यंत मार्गातून हटवण्यात आलेला नव्हता. अपघातग्रस्त टँकर मार्गातून हटवण्यापूर्वी त्यामधील गॅस काढणे गरजेचे होते. त्याकरिता रिकामा गॅस टँकर मागवण्यात आला होता. तो दुपारच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाल्यानंतर एका टँकरमधील गॅस दुसºया टँकरमध्ये काढण्याचे काम सुरू झाले. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली होती, परंतु काही प्रमाणात गॅसची दुर्गंधी येत असल्याने त्याठिकाणी गॅस गळतीची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे अनुचित प्रकार घडू नये याकरिता पुलावर वाहनांना बंदी करून पुलाखालून रहदारी सुरू करण्यात आली होती. त्यामुळे उरण फाटा पुलाखाली चक्का जाम होऊन दोन्ही दिशेच्या मार्गावर वाहनांच्या सुमारे पाच ते सात किमीच्या रांगा लागून वाहतूक ठप्प झाली होती. पर्यायी वाशी व सीबीडी येथून पामबीच मार्गे वाहतूक वळवण्यात आली होती. त्यामुळे नेहमी तुरळक रहदारी असलेल्या पामबीच मार्गावर देखील वाहतुकीचा खोळंबा झाला होता, तर सीबीडी ते सानपाडा या अवघ्या १० ते १५ मिनिटांच्या अंतरासाठी सुमारे एक तास लागत होता. संध्याकाळपर्यंत ही परिस्थिती कायम होती. त्यामुळे सायन-पनवेल मार्गाने प्रवास करणाºयांना बुधवारचा दिवस चांगलाच डोकेदुखीचा ठरला.अशातच मुंब्रा मार्गे कळंबोलीकडे जाणारी वाहतूक ऐरोली मार्गे सायन-पनवेल मार्गाने वळवण्यात आली होती. त्यामुळे सायन-पनवेल मार्गावर ऐरोली, रबाळे, कोपरखैरणे, तुर्भे याठिकाणी जागोजागी वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे बंदोबस्तावर असलेल्या वाहतूक पोलिसांचेही चांगलेच हाल झाले. मागील काही दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने वाहतूक नियंत्रित करण्यात वाहतूक पोलिसांची कसोटी लागत आहे.प्रवाशांची गैरसोयअपघातामुळे उरण फाटा ते खारघरदरम्यान प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पामबीच रोडवरून वळविण्यात आली होती; परंतु अचानक वाहनांची संख्या वाढल्यामुळे व रोडचे काम सुरू असल्यामुळे पामबीच रोडवरही वाहतूककोंडी झाली होती. यामुळे सकाळी कार्यालयात निघालेल्या नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई