शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Exclusive: रसायनीतल्या एचओसी कंपनीत मोठी वायुगळती, 48हून अधिक माकडं, 100च्यावर पक्षी मृत्युमुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 16:00 IST

रसायनी इथल्या पाताळगंगा परिसरात असलेल्या हिंदुस्थान ऑर्गेनिक केमिकल कंपनीतून मोठ्या प्रमाणात वायुगळती झाली आहे.

- अजय परचुरे/भालचंद्र जुमलेदार

पनवेल- रसायनी इथल्या पाताळगंगा परिसरात असलेल्या हिंदुस्थान ऑर्गेनिक केमिकल कंपनीतून मोठ्या प्रमाणात वायुगळती झाली आहे. बुधवारी रात्री 9.45 वाजताच्या सुमारास ही घडना घडली असून, या वायुगळतीमुळे 28 वानरांसह 48 माकडं मृत्युमुखी पडली आहेत. तर 100हून अधिक पक्षी गतप्राण झाले आहेत.हिंदुस्थान ऑर्गेनिक केमिकल(एचओसी) कंपनी ही इस्रोसाठी इंधन निर्मितीचं काम करते. 13 डिसेंबरला म्हणजेच बुधवारी रात्री 9.45 वाजताच्या सुमारास या कंपनीच्या इंधनाच्या टाकीतून ही वायुगळती सुरू झाली. या वायुगळतीचा आजूबाजूच्या परिसरातील असंख्य पशू-पक्ष्यांना फटका बसला. तसेच या वायुगळतीमुळे कंपनीतले दोन वॉचमनही बेशुद्ध झाले होते. त्यानंतर कंपनी बंद करण्यात आली असून, सध्या तरी कंपनीचा एक प्लांट सुरू आहे.28 वानरांसह 48 मृत्युमुखी पडलेल्या माकडांचा एचओसी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणालाही थांगपत्ता न लागू देता विल्हेवाट लावली आहे. या घटनेनं प्राणी मित्रांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. तसेच रसायनीच्या जवळपास कर्नाळा अभयारण्य असल्यानं या वायुगळतीमुळे वन्यजीवांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे.

  

वनविभागाकडून लोकमतच्या वृत्ताची दखल...वनविभागाकडून लोकमतच्या वृत्ताची दखल घेण्यात आली आहे. या घटनेबाबत वनअधिकाऱ्यांनी आपला तपास सुरू केला आहे. ज्या ठिकाणी माकडं आणि पक्षी पुरण्यात आले आहेत. त्या ठिकाणी खोदकाम करण्याचे काम वनधिकारी टीमकडून सुरू आहे. तसेच, पुरलेले प्राणी काढल्यानंतर त्यांचा रीतसर पंचनामा करून घेण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला पाचारण करण्यात आले आहे. याचबरोबर, कंपनीच्या गेट समोर स्थानिक पोलीसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.

टॅग्स :panvelपनवेल