शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कोपरखैरणे परिसरात गॅस गळती, अनेकांना उलटी, खोकल्याचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 02:16 IST

नवी मुंबई : अज्ञात प्रकारच्या दुर्गंधीमुळे कोपरखैरणेत अनेकांना बाधा झाल्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला.

नवी मुंबई : अज्ञात प्रकारच्या दुर्गंधीमुळे कोपरखैरणेत अनेकांना बाधा झाल्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला. अचानकपणे सुरू झालेला खोकला व उलटीच्या त्रासामुळे रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील एखाद्या कंपनीकडून दूषित गॅसची गळती होऊन नागरिकांंना बाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात होती.बुधवारी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. कोपरखैरणे स्थानक व त्यालगतचा सेक्टर ५ ते ८ परिसरात अनेकांना उग्र वासाचा त्रास होवू लागला होता. त्यामुळे रेल्वे स्थानकातून घराच्या दिशेने निघालेले अनेक जण अचानक सुरु झालेल्या खोकल्याने त्रस्त होते. त्यापैकी काहींना या दुर्गंधीचा त्रास असह्य झाल्याने उलटीचा त्रास होवू लागला. या दूषित वायूची बाधा झालेल्यांमध्ये बहुतांश लहान मुलांचा समावेश आहे. काही मिनिटांतच संपूर्ण परिसरात या अज्ञात दुर्गंधीचा त्रास जाणवू लागला. अनेकांना डोळ्यांना खाज सुटून मळमळ होवू लागल्याने रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती. पर्यायी नागरिकांनी घराचे दरवाजे, खिडक्या बंद करुन घ्याव्या लागल्या, तर रस्त्याने चालणाºयांना तोंडावर रुमाल बांधल्याशिवाय पर्याय राहिलेला नव्हता. मात्र ही दुर्गंधी नेमकी कशाची याचा उलगडा रात्री उशिरापर्यंत होवू शकला नाही. त्यामुळे नगरसेवक शंकर मोरे यांनी संपूर्ण घटनेची माहिती पालिका विभाग अधिकारी अशोक मढवी व अग्निशमन दलाला दिली. त्यानुसार मढवी यांनी कोपरखैरणे परिसरात ठिकठिकाणी जावून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच तो उग्र वास नेमका कशाचा आहे हे शोधण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांमार्फत सुरु होता. याचदरम्यान खबरदारी म्हणून वाशी पालिका रुग्णालय येथे वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे यांनी सांगितले. मात्र रात्री ९ वाजण्याच्या सुमारास काही प्रमाणात दुर्गंधीचा त्रास कमी झाला तरीही रहिवाशांमधील भीती कायम होती.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई