शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
4
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
5
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
6
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
7
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
8
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
9
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
10
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
11
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
12
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
13
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
14
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
15
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
16
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
17
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
18
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
19
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
20
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?

कोरोनाकाळात पेणच्या मूर्तिकारांना पावला गणपती बाप्पा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 08:27 IST

२५० ते २७० कोटींची उलाढाल; देश-विदेशात बाप्पांच्या तब्बल सव्वा लाख मूर्ती रवाना

ठळक मुद्देमहागाईमुळे गणेशमूर्ती कारागिरांच्या पगारातही १० टक्के वाढ झाली असल्याने कोरोना, महागाई, लॉकडाऊन नैसर्गिक आपत्तीवर मात करून गणेशमूर्ती कारखानदारांनी विपरीत परिस्थितीचाही सामना करून आपली परंपरा कायम राखली आहे.

नरेश पवारवडखळ (रायगड) : कोरोना, महागाई, लॉकडाऊन, कामगारांची कमतरता, चक्रीवादळाचा तडाखा, अतिवृष्टीमुळे गणेशमूर्ती भिजून नुकसान झाले असताना पेण तालुक्यातील गणेश मूर्ती कारखानदारांनी चिकाटीने व्यवसाय करीत यंदाही २५ ते ३० लाख गणेशमूर्तींची विक्री केली आहे. त्यातून सुमारे २५०ते २७० कोटींची उलढाल झाली असून, यंदा गणेश मूर्तिकारांना बाप्पा पावल्याचे चित्र आहे. 

पेणच्या मूर्तींना ग्राहकांनी पसंती दिल्याचे पुन्हा दिसून आले. दगडूशेठ हलवाई, टिटवाळा, पेशवाई, शिवरेकर, लालबागचा राजा, चिंतामणी, मोरेश्वर, अष्टविनायक, गरुडावर स्वार बाप्पा, खेकड्यावर स्वार बाप्पा यासह इतर विविध प्रकारच्या गणेशमूर्तींना ग्राहकांनी पसंती दिली आहे. पेण शहरासह तालुक्यातील हमरापूर, जोहे, कळवा, तांबडशेत, शिर्की, बोरी, वढाव येथील कारखान्यांत  साकारण्यात येणाऱ्या बाप्पाच्या मूर्ती महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये, तर विराजमान होतातच, याव्यतिरिक्त देश-विदेशातही सव्वा लाख बाप्पांच्या मूर्ती रवाना झाल्या आहेत.

एसटी, रेल्वे बंदचा फटकाकोकण रेल्वे बंद असल्याने रेल्वेमधून कोकणात जाणाऱ्या सुमारे २००० ते २५०० मूर्ती यावर्षी कोकणात गेल्याच नाहीत. त्यामुळे गणेशमूर्ती कारखानदारांना २० ते २५ लाखांचा फटका बसला आहे. 

पीओपीच्या गणेशमूर्तींना पसंतीn ग्राहकांनी पीओपीच्या गणेशमूर्तींना अधिक पसंती दिली असून, शाडू मातीच्या गणेशमूर्ती विक्रीविना पडून राहिल्या आहेत. n केंद्र सरकारच्या पीओपी मूर्तीवरील बंदीच्या धरसोड धोरणाचा फटका गणेशमूर्ती कारखानदारांना बसला आहे. n पीओपीच्या मूर्ती या मातीच्या मूर्तीपेक्षा वजनाला कमी व दिसायला आकर्षक असतात, त्याचप्रमाणे त्यांची किंमतही कमी असते. तसेच हाताळण्यास व वाहतुकीसही योग्य असतात.

बाप्पाच्या मूर्ती ३० ते ४० टक्क्यांनी महाग 

n महागाईचा फटका बाप्पांच्या मूर्तींनाही बसला असून, यावर्षी गणेशमूर्तीं ३० ते ४० टक्क्यांनी महागल्या आहेत. गणेशमूर्तीसाठी लागणारी पीओपी व शाडूमाती गुजरातवरून मागविण्यात येते. ही मातीही महागली आहे.n गणपतीसाठी वापरण्यात येणाऱ्या रंगाच्या किमतीतही २५ ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात मागील दोन वर्षांत झालेल्या वाढीमुळे वाहतुकीचा खर्च ३० ते ४० टक्क्यांनी वाढला आहे. n महागाईमुळे गणेशमूर्ती कारागिरांच्या पगारातही १० टक्के वाढ झाली असल्याने कोरोना, महागाई, लॉकडाऊन नैसर्गिक आपत्तीवर मात करून गणेशमूर्ती कारखानदारांनी विपरीत परिस्थितीचाही सामना करून आपली परंपरा कायम राखली आहे.

कोरोनाकाळात कामगारांची कमतरता असल्याने घरातील सर्वच मंडळी यावर्षी मूर्ती घडविण्यात सामील झाली होती. शाळा बंद असल्याने मुलांनीदेखील आपल्या वडिलांच्या व्यवसायात मदत केली व श्रींच्या अनेक आकर्षक मूर्ती घडविल्या. अनेक संकटांवर मात करूनदेखील पेणच्या गणेशमूर्तिकारांनी आकर्षक, सुबक मूर्ती घडविण्याचे काम केले.    - कुणाल पाटील, मूर्तिकार, कुणाल कला केंद्र, हमरापूर, पेण

 

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवpanvelपनवेल