शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांना आनंद देणारा गणेशोत्सव, रायगड जिल्हा रु ग्णालयाचे ५९वे वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 05:13 IST

ऐन सणाच्या काळात आणि त्यातही गणेशोत्सवात आजारी पडून रुग्णालयात दाखल होणे कुणालाही आवडणार नाही; परंतु प्रकृतीचा काही नेम नसतो. अशा वेळी रु ग्णालयात दाखल झालेल्या रु ग्णांना आपल्या घरच्या गणेशोत्सवात सहभागी होता येत नाहीÞ. त्याचे शल्य त्यांना सारखे जाणवत राहते.

विशेष प्रतिनिधी अलिबाग : ऐन सणाच्या काळात आणि त्यातही गणेशोत्सवात आजारी पडून रुग्णालयात दाखल होणे कुणालाही आवडणार नाही; परंतु प्रकृतीचा काही नेम नसतो. अशा वेळी रु ग्णालयात दाखल झालेल्या रु ग्णांना आपल्या घरच्या गणेशोत्सवात सहभागी होता येत नाहीÞ. त्याचे शल्य त्यांना सारखे जाणवत राहते.रु ग्णाला खरच पटकन बरे व्हायचे असेल, तर तो प्रथम मानसिकदृष्ट्या बरा होणे गरजेचे असते, त्यासाठी तसे वातावरण हा महत्त्वाचा मुद्दा आहे, या अत्यंत आरोग्यदायी भावनिक तथा श्रद्धेय मुद्द्याचा जाणीवपूर्वक विचार करून येथील रायगड जिल्हा सरकारी रुग्णालयात सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा ५८ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. यंदा ५९वा सार्वजनिक गणेशोत्सव जिल्हा रुग्णालयात साजरा करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या या गणेशोत्सवात रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कार्यालयीन कर्मचारी वर्ग असे सर्वच जण सक्रियतेने सहभागी होतात. गणेशोत्सवात आरोग्य विषयक जनजागृती हा हेतू या गणपतीच्या आरास आणि सजावटीच्या माध्यमातून अनाहूतपणे गेल्या अनेक वर्षांपासून साध्य करण्यात येतो. जिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात असलेल्या परिचारिका प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थिनींसह परिचारिका रांगोळी, चित्रकला आदी विविध स्पर्धांचे आयोजन येथे करतात.रुग्णालयात दाखल असणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना जिल्हा रुग्णालयातील हा गणपती बाप्पा आपला वाटतो. गणेशोत्सव काळात रुग्णालयात दाखल असणारे रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यावर पुढच्या वर्षी आवर्जून या गणपतीला नमस्कार करायाला वा प्रसंगी आपला नवस फेडण्याकरितादेखील येत असतात. यंदा रायगड जिल्हा रुग्णालय गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी हे आहेत. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव