शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास शासनानेच करावा, गणेश नाईक यांची मागणी

By कमलाकर कांबळे | Updated: July 22, 2024 15:21 IST

गणेश नाईक यांचा सोमवारी ऐरोली येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात जन सुसंवाद कार्यक्रम पार पडला.

नवी मुंबई:  झोपडपट्ट्यांमधून  राहणाऱ्या नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना हक्काचे आणि पक्के घर  मिळायला हवे. नवी मुंबईतील झोपडपट्टीवासियांना त्यांच्या घरांची आणि त्याखालील जमिनीची मालकी द्यावी. तसेच शासनाने  म्हाडाच्या धर्तीवर झोपडपट्ट्यांचा विकास करावा, अशी मागणी ऐरोलीचे आमदार गणेश नाईक  केली आहे.

गणेश नाईक यांचा सोमवारी ऐरोली येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात जन सुसंवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी निवेदने दिली. यापैकी अनेक निवेदनांवर  तात्काळ कार्यवाही करण्यात आली.  गाव, गावठाण, शहर, झोपडपट्टी परिसर, औद्योगिक परिसर, एलआयजी, एमआयजी, सोसायट्या सर्वच भागातील नागरिकांनी आपल्या समस्या आणि अडचणी मांडल्या. याप्रसंगी पाणीपुरवठा, वीज पुरवठा, आरोग्य, शिक्षण इत्यादी समस्यांच्या निवेदनांचा  निपटारा करण्यात आला. त्यानंतर आ. नाईक यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. नवी मुंबईची निर्मिती करण्यासाठी येथील प्रकल्पग्रस्तांनी  आणि स्थानिकांनी कवडीमोल भावात  त्यांच्या जमिनी सिडकोला दिल्या. नियमानुसार गावठाण विस्तार योजना  सिडकोने राबवली नाही. साडेबारा टक्क्यांची योजना पूर्ण केली नाही.  काळाच्या ओघात  कुटुंबाचा विस्तार झाल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी राहण्यासाठी घरे आणि उदरनिर्वाहासाठी  वाणिज्य बांधकामे केली. आज पर्यंतची  अशा प्रकारची सर्व बांधकामे नियमित करावीत. प्रकल्पग्रस्तांना घरांचा आणि त्या खालील जमिनीचा मालकी हक्क द्यावा. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील झोपडपट्ट्यांचा म्हाडाच्या धरतीवर शासनाने विकास करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईGanesh Naikगणेश नाईक