शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

नवी मुंबईमध्ये ३० हजार घरांमध्ये होणार गणरायाचे आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 23:51 IST

गृहनिर्माण सोसायटीमधील मंडळांची संख्या जास्त आहे. मनपाकडून ८४ मंडळांनी मंडप उभारण्यासाठी परवानगी घेतली आहे.

नवी मुंबई : गणरायाच्या स्वागतासाठी शहरात ३० हजार घरांमध्ये गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. ३३० ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे. उत्सवादरम्यान शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महानगरपालिका प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेऊन गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. अनेक मंडळांनी सार्वजनिक उत्सव रद्द केला आहे. बहुतांश मंडळांनी दीड दिवसाच्या उत्सवाचे आयोजन केले आहे. आगमनासाठी व विसर्जनाच्या दिवशी मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी पोलिसांकडून ५५० सार्वजनिक मंडळांनी परवानगी घेतली होती. या वर्षी ३३० मंडळांनीच परवानगी घेतली आहे. यामध्येही गृहनिर्माण सोसायटीमधील मंडळांची संख्या जास्त आहे. मनपाकडून ८४ मंडळांनी मंडप उभारण्यासाठी परवानगी घेतली आहे.उत्सव शांततेत व आनंदामध्ये पार पाडण्यासाठी ृबंदोबस्तासाठी ५५० पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. यामध्ये २१ पोलीस निरीक्षक व ६२ सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. सर्व सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. उत्सवादरम्यान कोठेही गर्दी होऊ नये, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल अशी कृती होणार नाही याकडे लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.>विसर्जनासाठी १३५ कृत्रिम तलावमनपा क्षेत्रात प्रत्येक वर्षी २३ तलावांमध्ये विसर्जन केले जाते. या वर्षी पहिल्यांदा १३५ कृत्रिम तलावांची निर्मिती केली असून त्यामध्ये बेलापूर विभागात १५, नेरूळ विभागात २७, वाशी विभागात १६, तुर्भे विभागात १७, कोपरखैरणे विभागात १४, घणसोली विभागात १७, ऐरोली विभागात २२ व दिघा विभागात ७ तलावांचा समावेश आहे. विभागनिहाय कृत्रिम विसर्जन तलावांच्या स्थळांबाबतची माहिती त्या त्या विभागांमध्ये होर्डिंगद्वारे प्रसिद्ध करण्यात येत असून व्हॉट्सअ‍ॅप तसेच महानगरपालिकेची वेबसाइट, फेसबुक, टिष्ट्वटर अशा सोशल मीडियावरूनही प्रसिद्धी करण्यात येत आहे.>कंटेनमेंट झोनमधील विसर्जनासाठी श्रीमूर्ती संकलन व्यवस्थाकंटेनमेंट झोनमध्ये राहणाºया नागरिकांकडील श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी या कंटेनमेंट झोनच्या प्रवेशद्वाराजवळ नवी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाच्या वतीने श्रीमूर्ती संकलित केल्या जाणार आहेत. त्या मूर्तींचे सुयोग्य रीतीने विसर्जन केले जाणार आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव