शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

खारघरहून थेट जा जेएनपीए, विमानतळावर; खारकोपर ते उलवे सेक्टर १३ ही अंडरपासने जोडणार

By नारायण जाधव | Updated: December 15, 2023 05:49 IST

सिडकोने खारघर ते उलवेपर्यंत सागरी रस्ता  प्रस्तावित केला आहे.

नारायण जाधव

नवी मुंबई : शहरातील सर्वांत प्रतिष्ठित अशा खारघर नोडमधून उलवे, जेएनपीए बंदरासह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर  जाण्यासाठी आता बेलापूर नोडला वळसा घालून जाण्याची गरज भासणार नाही. कारण सिडकोने खारघर ते उलवेपर्यंत सागरी रस्ता  प्रस्तावित केला आहे.

सिडकोने आपल्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात सायन-पनवेल रोडवरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून प्रवाशांना पर्यायी प्रवासाठी खारघर ते उलवे असा सागरी किनारा प्रस्तावित केला आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात २०५ कोटी ४९ लाख रुपयांची तरतूूद केली आहे.

तळोजा येणार विमानतळाच्या जवळ

खारघर नोडसह येथील इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क, तळोजा आणि खारघर येथील पंतप्रधान आवास योजनेच्या गृहप्रकल्पात राहायला येणाऱ्या रहिवासी आणि व्यावसायिकांना थेट उलवेसह सी लिंक, जेएनपीए आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे या रस्त्याद्वारे जाता येणार आहे. यामुळे सध्याचा बेलापूर किल्लेगावठाण मार्गे होणारा वळसा टळून वेळ, श्रम आणि पैसा यांची बचत होणार आहे.

दक्षिण मुंबईची कनेक्टिव्हिटीही वाढणार

प्रस्तावित सागरी रस्ता १०.१० किमी लांबीचा असून सहा पदरी राहणार आहे. यामुळे नवी मुंबई आणि दक्षिण मुंबईची कनेक्टिव्हिटीही सीलिंकमुळे वाढण्यास मदत होणार आहे. सिडकोने याआधीच यासाठी महत्त्वपूर्ण सीआरझेड मंजुरी मिळवली आहे.

खारकोपर ते उलवे होणार अंडरपास

आता सिडकोने खारकोपर येथील पंतप्रधान आवास योजनेचा गृहप्रकल्प ते उलवे सेक्टर-१३ यांना  जोडणाऱ्या अंडरपासच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू केली आहे. यात खारकोपर स्टेशनच्या दोन्ही बाजूचा ३० मीटर रुंदीच्या उर्वरित रस्ता आणि उलवे सेक्टर १३ पर्यंत अंडरपासचीही प्रक्रिया सुरू केली आहे. या कामावर पावणेतेरा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.