शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मोफत वाय-फाय ठरले औटघटकेचे

By admin | Updated: July 13, 2015 02:57 IST

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध राजकीय पक्षांनी ठिकठिकाणी सुरू केलेली मोफत वाय - फाय सेवा औटघटकेची ठरली आहे. गाजावाजा करीत सुरू करण्यात आलेल्या

कमलाकर कांबळे , नवी मुंबईविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध राजकीय पक्षांनी ठिकठिकाणी सुरू केलेली मोफत वाय - फाय सेवा औटघटकेची ठरली आहे. गाजावाजा करीत सुरू करण्यात आलेल्या या वाय-फाय सेवेने निवडणूक संपताच मान टाकली आहे. त्यामुळे सायबर सिटीचा टेंभा मिरविणाऱ्या या शहरातील तरुणाईला जलद इंटरनेट सेवेसाठी मॉल्स किंवा बड्या रेस्टॉरेंटचा आधार घ्यावा लागत आहे.माहिती व तंत्रज्ञानाचे एक आधुनिक शहर म्हणून नवी मुंबईची जागतिक स्तरावर ओळख निर्माण होत आहे. शहरात आयटी उद्योगाचे जाळे विणले गेले आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सेवा पुरविणारी कॉल सेंटर्सही आहेत. त्यामुळे इंटरनेट वापराचे प्रमाणही लक्षणीय आहे. इंटरनेट सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टीने सायबर सिटीत महत्त्वाच्या ठिकाणी मोफत वाय-फाय सेवा सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने चार वर्षांपूर्वी घेतला होता. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे खीळ बसली होती. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी सवंग प्रसिध्दीसाठी शहरवासीयांना मोफत वाय-फाय सेवा देण्याच्या वल्गना केल्या होत्या. काही ठिकाणी त्याचा शुभारंभही झाला. मात्र ही सेवा लवकरच बंद पडली.ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी शहरात सर्वप्रथम मोफत वाय-फाय सेवेचा शुभारंभ केला. पहिल्या टप्प्यात वाशी आणि कोपरखैरणे रेल्वे स्थानकात ही सेवा उपलब्ध करण्यात आली होती. त्यानंतर सर्व स्थानकांत ही सेवा सुरू करण्याची घोषणा राष्ट्रवादीने जाहीरनाम्यात केली होती. प्रत्यक्ष मात्र सुरू करण्यात आलेली दोन स्थानकांतील वाय-फाय सेवा पंधरा दिवसांतच बंद झली होती. विधानसभेनंतर अवघ्या सहा महिन्यांतच पालिकेच्या निवडणुका लागल्या. पुन्हा मोफत वाय-फाय सेवेची हवा सुरू झाली. सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी नेरूळ गावात शुभारंभ केला. त्यापाठोपाठ कोपरखैरणे सेक्टर १२ परिसरात शिवसेनेचे विलास म्हात्रे यांनी ही सेवा सुरू करून मतदारांना गोंजारण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या अनेक इच्छुकांकडून आपापल्या प्रभागातील नागरिकांना मोफत वाय-फाय सेवेचा ट्रेलर दाखविण्यात आला. मात्र निवडणुकीचा फड संपताच वाय-फाय सुविधेचा खेळही संपुष्टात आला.