शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

शिपिंगमध्ये नोकरीच्या बहाण्याने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2023 10:26 IST

गुन्हा दाखल : कार्यालय गुंडाळून ठोकली धूम

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शिपिंगमध्ये नोकरीस इच्छुक असणाऱ्यांना विदेशात नोकरीची हमी देऊन वेगवेगळ्या कारणांनी पैसे उकळून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. एपीएमसी आवारात कार्यालय थाटून त्यांनी तरुणांच्या मुलाखती घेतल्या होत्या. मात्र, पैसे हाती लागल्यानंतर त्यांनी कार्यालय बंद करून पळ काढल्याचे उघडकीस आले.

एपीएमसी आवारात फ्युचरिक मेरिटाईम नावाने कार्यालय थाटून संबंधितांनी अनेकांना गंडा घातला आहे. मरीन अकॅडमीचे शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांना फोन करून नोकरीची हमी देण्यात आली होती, तर नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांना एपीएमसीमधील कार्यालयात बोलावून त्यांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यामध्ये काहींना सिंगापूर व इतर देशात शिपिंग कंपन्यांमध्ये नोकरीची खात्री देऊन प्रत्येकाकडून ३ ते ५ लाख रुपये उकळण्यात आले होते. 

यानंतर त्यांना काही दिवसातच वेगवेगळ्या देशातील कंपन्यांमध्ये नोकरीचे नियुक्तिपत्र, व्हिजा व तिकीट दिले जाईल, असे सांगण्यात आले. परंतु, दोन महिने उलटूनही प्रत्यक्षात तिकीट मिळत नसल्याने काहींनी एपीएमसीमधील कार्यालयात धाव घेतली. 

अपहाराची रक्कम कोटींच्या घरात?यावेळी काही दिवस अगोदरच कार्यालय बंद करून संबंधितांनी पळ काढल्याचे समोर आले. याप्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणांनी पोलिसांकडे तक्रार केली असता अजहर मुल्ला, अंकिता, आशिका, शिवम, निधी यांच्यावर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यांची पूर्ण नावे अथवा त्यांच्याबद्दलची अधिक माहिती तरुणांना नाही. त्यांनी देशभरातील अनेक तरुणांना नोकरीच्या बहाण्याने गंडा घातल्याची शक्यता आहे. त्यामुळे अपहाराची रक्कम कोटींच्या घरात जाण्याची शक्यता नाकारत येत नाही.