शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कडधान्य व्यापाऱ्यांची दलालाकडून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:45 IST

बनावट ग्राहकाच्या नावे कडधान्यांची खरेदी करून दलालाने व्यापाऱ्यांना साठ लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलीसठाण्यात दलालाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

नवी मुंबई : बनावट ग्राहकाच्या नावे कडधान्यांची खरेदी करून दलालाने व्यापाऱ्यांना साठ लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलीसठाण्यात दलालाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.के. भरत उर्फ भरत सनसिंग चांदरा असे गुन्हा दाखल झालेल्या दलालाचे नाव आहे. तो एपीएमसी आवारात दलालीचे काम करायचा. त्याने काही वर्षात व्यापाºयांचा विश्वास संपादित करून हा अपहार केला आहे. मागील अनेक वर्षांपासून तो एपीएमसी धान्य मार्केटमध्ये दलालीचे काम करतो. यादरम्यान त्याने व्यापाºयांना ग्राहक मिळवून देऊन त्यांच्यातील व्यवहार देखील चोख ठेवले होते. मात्र मागील दोन महिन्यात त्याने अनेक व्यापाºयांकडून ग्राहकांच्या नावे मोठ्या प्रमाणात उधारीवर कडधान्य खरेदी केले. त्याच्या बिलाची रक्कम देण्यास तो टाळाटाळ करू लागला होता. यामुळे व्यापाºयांनी ट्रान्सपोर्टरच्या माध्यमातून ग्राहकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, ज्यांच्या नावे माल घेतला ती बनावट नावे असल्याचे उघड झाले. त्यावरून के. भरत उर्फ भरत चांदरा याने आपली फसवणूक केल्याचे व्यापाºयांच्या निदर्शनास आले. सद्यस्थितीला विशाल शेठीया यांच्यासह इतर ५१ व्यापाºयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून एकूण सुमारे ६० लाखांचे कडधान्य त्याने उधारीवर खरेदी केले आहे. त्यामध्ये तूरडाळ, मूगडाळ, मसूर, चणाडाळ, वाटाणा आदींचा समावेश आहे. एपीएमसी आवारातून माल बाहेर नेताना संबंधित वाहनाचा गेटपास बनवणे आवश्यक आहे. मात्र के. भरत हा विना गेटपास मालाची वाहतूक करायचा हे देखील या प्रकरणात समोर आले आहे. तर बनावट ग्राहकांच्या नावे खरेदी केलेला माल त्याने मालाड येथील एका व्यापाºयाला स्वस्त दरात विकून स्वत:चा फायदा करून घेतला आहे.व्यापाºयांच्या तक्रारीवरून त्याच्याविरोधात एपीएमसी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्याने इतरही अनेक व्यापाºयांची फसवणूक केल्याची शक्यता असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई