शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड खरेदीत नौदल अधिकाऱ्यांची फसवणूक; तिघांवर गुन्हा दाखल 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: October 10, 2023 16:27 IST

३ कोटी १३ लाखाचा अपहार

नवी मुंबई : उरण परिसरात भूखंड घेण्यासाठी इच्छुक असलेल्या नौदलाच्या अधिकाऱ्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. स्काय गरुडा नावाच्या कंपनीकडे त्यांनी भूखंडासाठी पैसे भरले होते. परंतु पैसे भरल्यानंतर भूखंडाचा ताबा देण्यास टाळाटाळ होऊ लागल्यानंतर फसवणूक होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अखेर चार वर्षांनी याप्रकरणी संबंधित तिघांविरोधात केलेल्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नौदलात सुभेदार पदावर असलेल्या संजीत पॉल व त्यांच्या सहकाऱ्यांच्या तक्रारीवरून सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नौदलाच्या १७ अधिकाऱ्यांनी स्काय गरुडा कंपनीची उरण परिसरातल्या भूखंड विक्रीची जाहिरात पाहिली होती. त्याद्वारे त्यांनी २०१९ मध्ये कंपनीच्या सीबीडी येथील कार्यालयात येऊन नॉन ऍग्रीकल्चर केलेला भूखंड घेण्यास इच्छुकता दर्शवली होती. त्यासाठी सर्वानी मिळून टप्प्या टप्प्याने एकूण ३ कोटी १३ लाख रुपये स्काय गरुडाचे काकासाहेब खाडे, विकास दहिफले, मोहिनी तांदळे यांना दिले होते.

पैसे घेतल्यानंतर काही दिवसात त्यांनी नोंदणीला टाळाटाळ करण्यास सुरवात केली. त्यानंतर दाखवलेल्या भूखंडाऐवजी दुसरा भूखंड देतो असे सांगण्यात आले. यामुळे काही अधिकाऱ्यांनी दिलेली रक्कम परत मागितली असता त्यांना धनादेश देण्यात आले होते. परंतु ते धनादेश न वटल्याने व तिघांनीही संपर्क तोडल्याने फसवणूक होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी कार्यालयात धाव घेतली असता ते देखील बंद झाल्याचे समोर आले. यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सीबीडी पोलिसांकडे तक्रार अर्ज केला आहे. त्याद्वारे काकासाहेब खाडे, विकास दहीफले व मोहिनी तांदळे यांच्यावर सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी इतरही अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई