शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
2
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
3
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
4
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
5
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
6
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
7
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
8
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
9
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
10
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
11
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
12
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
13
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
14
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
15
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
16
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
17
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
18
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
19
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
20
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं

किरकोळ वादातून चौघांवर हल्ला, एकाचा मृत्यू : नऊ महिन्यांपूर्वीच्या भांडणाच्या रागातून केले कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 02:47 IST

किरकोळ वादातून एकाने चौघांवर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी ऐरोली येथे घडला. या प्रकारात एकाचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी आहेत.

नवी मुंबई : किरकोळ वादातून एकाने चौघांवर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी ऐरोली येथे घडला. या प्रकारात एकाचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी आहेत. सदर घटनेनंतर पोलिसांनी मारेकºयाला अटक केली असून त्याने जुन्या वादातून त्यांच्यावर हल्ला केल्याचे समोर आले आहे.धनंजय भोईर असे पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो रोजवूड सोसायटीत राहणारा आहे. त्याच सोसायटीत राहणाºया कुटुंबातील चौघांवर त्याने दुकानात घुसून कोयत्याने वार केले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. सोहन चौधरी, अर्जुन चौधरी व मोहन चौधरी अशी जखमींची नावे आहेत. तर जलाराम भोईर असे मयताचे नाव असून तो सोहन चौधरी यांच्या दुकानात काम करायचा. सोहन यांचे मेडिकल व जनरल स्टोअर असून मंगळवारी दुपारी चौघेही त्याठिकाणी होते. यावेळी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी आलेल्या धनंजय भोईर याने सोबत आणलेल्या कोयत्याने सोहन यांच्यावर वार करायला सुरवात केली. यावेळी इतर तिघांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने त्यांच्यावरही वार केले. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. याप्रकरणी धनंजय भोईर याला अटक केली असून, हल्ला करताना दुखापत झाल्याने त्यालाही रुग्णालयात दाखल केले असल्याचे सहायक आयुक्त प्रदीप जाधव यांनी सांगितले.सोहन चौधरी व धनंजय भोईर हे दोघेही ऐरोलीतील रोजवूड सोसायटीत राहणारे आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता. धनंजय हा सोहन यांच्या लहान मुलाला खेळवण्यासाठी घरी घेवून जात असे.परंतु भोईर याची सोसायटीत प्रतिमा चांगली नसल्याच्या कारणावरून सोहन यांना ते आवडत नसे. यावरून त्यांनी त्याला समज देत त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार देखील केली होती. त्यानंतर इतरांनीही भोईरविरोधात तक्रार करून देखील स्थानिक पोलीस त्याला पाठीशी घालत होते, असाही सोसायटीमधील महिलांचा आरोप आहे. अखेर मंगळवारी सकाळी चौधरी व भोईर यांच्यात पुन्हा वाद झाला असता, भोईर याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून