शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

ड्रग्ज तस्करीतले ‘विदेशी हात’ , आंतरराष्ट्रीय रॅकेटचे राज्यभर पसरले जाळे

By सूर्यकांत वाघमारे | Updated: January 16, 2025 09:13 IST

मागील पाच ते सहा वर्षांत नवी मुंबईतल्या गल्ली-बोळांत ड्रग्जचे जाळे पसरले आहे

नवी मुंबई : मुंबई, नवी मुंबईसह राज्यभरातील महानगरे ड्रग्जच्या विळख्यात सापडत चालली आहेत. कल्चरच्या नावाखाली विद्यार्थ्यांसह बेरोजगार तरुण, तरुणी नशेच्या आहारी जात आहेत. या परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चिंता व्यक्त केली आहे. शिवाय ड्रग्जआडून अदृश्य शक्तींकडून थेट देशाच्या भवितव्यावरच हल्ला होत असल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्याने ड्रग्ज विक्रीतल्या विदेशी टोळ्या देशाची डोकेदुखी ठरत असल्यावर शिक्कामोर्तब होत आहे. 

मागील पाच ते सहा वर्षांत नवी मुंबईतल्या गल्ली-बोळांत ड्रग्जचे जाळे पसरले आहे. हे ड्रग्ज विक्री व पुरवठा करणाऱ्यांमध्ये नायजेरियन टोळ्यांचा सहभाग समोर येत आहे. त्यांच्यावर कारवाईत पोलिसांना मर्यादेचे ‘बंधन’ असल्याने त्यांची साखळी कायमची तुटू शकलेली नाही. नवी मुंबई पोलिसांनी गतवर्षात एनडीपीएसच्या ६६० कारवायांमधून ३३.२७ कोटींचे ५७२ किलो अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्यामध्ये ५८ नायजेरियन व्यक्तींना अटक केली आहे. त्याशिवाय अवैध वास्तव्य केल्याप्रकरणी ६६९ नायजेरियन नागरिकांना मायदेशी पाठवून ५४० जणांना ब्लॅकलिस्ट केले आहे. ड्रग्ज तस्करी, अवैध वास्तव्याप्रकरणी नायजेरियनवर झालेल्या कारवाईंचे प्रमाण बांगलादेशींपेक्षाही अधिक आहे.

नायजेरियन टोळ्यांवर सर्वाधिक कारवाया२०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये सर्वाधिक नायजेरियन टोळ्यांवर कारवाया झाल्या आहेत. त्यांच्या राहत्या ठिकाणांवर रात्री-अपरात्री छापे टाकून त्यांच्याकडील चरस, कोकेन, एमडी असे ड्रग्ज जप्त केले आहेत. त्यावरून ड्रग्ज तस्करी व विक्रीत विदेशी ताकद सक्रिय असल्याचे स्पष्ट होत आहे. तीन वर्षांपूर्वी जेएनपीटी परिसरातून जप्त केलेल्या ३६२ कोटींच्या ड्रग्जचेही देशाबाहेर संबंध जोडले होते; परंतु शिक्षण, व्यवसायाच्या नावाने व्हिसा मिळवून भारतात प्रवेश करणाऱ्या नायजेरियनचे लोंढे, परत न जाता मुंबईलगत नवी मुंबईसारख्या शहरात आश्रय मिळवून ड्रग्ज रॅकेट चालवत आहेत. त्यांना ते पुरवते कोण? हे कोठून येते याचे कोडे मात्र सुटलेले नाही. परिणामी गल्लीबोळांत अमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने, तरुणांना नशेच्या आहारी ढकलून त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे भवितव्य, तसेच देशाची तरुण पिढी उद्ध्वस्त करण्याचे देशविघातक काम होताना दिसत आहे.

नवी मुंबई पोलिसांची कारवाई अमली पदार्थ      २०२३    २०२४ मेथॉक्युलॉन         ५,९६,५२,७६०      १२,६७,६९,८८०गांजा      ८,३६,९३१        ६७,८३,४४५कोडाईन सिरप       २,०८,३३३      ३,२६४एलसीडी पेपर     १९,८०,७५०       ३३,५५,०००एमफेटाईन     २३,८४,०००      ०००एमडीएमए      २२,१०,०००      २९,९८,००० एमडी      ९,३३,३४,९००      ००० हेरॉइन     ३३,१६०      ४७,१५,५००ब्राउन शुगर     १,७८,९२०     ३०,१०,०००कोकेन      १,२५,२०,०००       १६,७०,१४,८००ट्रॅमड्रॉल टॅबलेट     ३,६४,४०,०००     ००००

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी