शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

जबरी मोबाईलचोरी करणाऱ्याला दोन तासात अटक; वाशी रेल्वे स्थानकातील घटना

By सूर्यकांत वाघमारे | Updated: November 9, 2023 17:19 IST

वाशी रेल्वे स्थानकात विद्यार्थिनीचा मोबाईल हिसकावून पळालेल्या चोरट्याला रेल्वे पोलिसांनी दोन तासात अटक केली आहे.

नवी मुंबई : वाशी रेल्वे स्थानकात विद्यार्थिनीचा मोबाईल हिसकावून पळालेल्या चोरट्याला रेल्वे पोलिसांनी दोन तासात अटक केली आहे. त्याच्याकडून इतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. चेंबूर येथे राहणाऱ्या ममता गुप्ता (१८) या विद्यार्थिनी सोबत वाशी रेल्वे स्थानकात हि घटना घडली होती. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास ती रेल्वे स्थानकाच्या पादचारी भुयारी मार्गातून फलाटावर चालली होती. यावेळी दबा धरून बसलेल्या अज्ञात तरुणाने तिच्या हातातील मोबाईल हिसकावला होता.

याप्रकरणी रात्री उशिरा तिने वाशी रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यावरून गुन्हा दाखल होताच वरिष्ठ निरीक्षक संभाजी कटारे यांनी सहायक निरीक्षक रामेश्वरी पांढरे, उपनिरीक्षक दत्तात्रेय बदाले, सतीश पवार, मनोज भगत, कपिल देशमुख, योगेश शेजवळ व श्रीधर मैदांड यांचे पथक केले होते. त्यांनी स्थानकातील व स्थानकाबाहेरील सीसीटीव्ही मधून संशयित चोरट्याची माहिती मिळवली होती. त्याद्वारे दोन तासात सानपाडा परिसरातून अजय प्रकाश धोतरे (२३) याचा शोध घेऊन अटक केली.

अंग झडतीमध्ये त्याच्याकडे चोरीचा मोबाईल देखील आढळून आला असून तो मूळचा सांगलीचा आहे. त्याच्याकडून इतरही मोबाईल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी वाशी रेल्वे पोलिस अधिक तपास करत आहेत.