शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

सूचनांचे पालन करीत नवी मुंबईत सुरू होणार शाळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 23:40 IST

महापालिकेची तयारी सुरू ; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची घेणार काळजी, शहरातील शाळांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जून महिन्यात सुरू होणाऱ्या शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेच्या शाळा सुरू करण्याची तयारी सुरू आहे.

कोरोना संकटामुळे या वर्षी प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळांच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण देणे सुरू आहे. अनलॉकमध्ये विविध गोष्टींत शिथिलता देताना नववी ते बारावीतील विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्षात शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यादरम्यान, विद्यार्थ्यांनी मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी गोष्टींचा वापर करणे बंधनकारक असून पालिकेच्या माध्यमातून शहरातील शाळांना सूचना दिल्या आहेत. शाळेची स्वच्छता, निर्जंतुकीकरण फवारणी आदी कामे केली जाणार आहेत. विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर आदी सुविधा पुरविण्यात येणार असून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात येणार आहेत. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मल गन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  

शिक्षकांची होणार कोरोना चाचणीशाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक, शाळेतील कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी गुरुवारी नेरूळ येथील लॅबमध्ये  करण्यास सुरुवात झाली. महापालिकेच्या माध्यमातून शहरातील खाजगी शाळांमधील शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणीदेखील करून देण्यात येणार आहे.

एकूण पाच हजार ५०० विद्यार्थी नवी मुंबई पालिकेच्या २० माध्यमिक शाळांमध्ये या वर्षी नववी आणि दहावीच्या वर्गात सुमारे पाच हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्राथमिक विभागाचे १३५ शिक्षक असून ६० शाळांमध्ये काम करीत आहेत. शासनाच्या सूचनांनुसार पालिकेने शाळा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा सुरू करण्याची तयारी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. महापालिकेच्या शिक्षकांबरोबर शहरातील खाजगी शाळांच्या शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.- संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त, न.मुं.म.पा.

टॅग्स :Schoolशाळा