शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

पर्यटनाला चालना... नवी मुंबईत उभे राहणार ‘फ्लोटेल’; बेलापूर-उलवे खाडीची निवड

By नारायण जाधव | Updated: September 1, 2022 16:49 IST

मेरी टाइम बोर्डाचा प्रकल्प : बेलापूर-उलवे खाडीची निवड

नारायण जाधव

नवी मुंबई : नवी मुंबईतीलबेलापूर-उलवे खाडीच्या परिसरात लवकरच फ्लोटेल अर्थात तरंगते फिरते हॉटेल उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाचा हा प्रकल्प असून, यामुळे मुंबई-नवी मुंबईतील पर्यटन विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मेरी टाईम बोर्डाने व्यक्त केला आहे. सध्या हा प्रकल्प निविदास्तरावर आहे. या तरंगत्या फिरत्या हॉटेलसाठी अनुभवी आणि पात्र इच्छुक भागीदारांच्या शोधासाठी मेरी टाइम बोर्डाने स्वारस्य अभिकर्त्यांसाठी देकार मागविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘फ्लोटेल’ हे नाव ‘फ्लोट’ आणि ‘हॉटेल’ या शब्दांचे एकत्रीकरण आहे. असे हॉटेल असते जे नद्या, सरोवरे, बंदर आणि महासागरांत एकतर तरंगते असते किंवा फ्लोट म्हणजे त्या परिसरात पाण्यावर फिरणारे असते. कायमस्वरुपी नांगरलेली जहाजे किंवा विशिष्ट मार्गांवर ही हॉटेलरुपी जहाजे परिसरात फिरत असतात. अशी ही ‘फ्लोटेल’ सर्वप्रथम १९७० आणि ८० च्या दशकात चीन आणि हाँगकाँगमध्ये लोकप्रिय झाल्याने नंतर कालौघात ती जगभर पसरली.

यासाठी पर्यटकांची असते ‘फ्लोटेल’ला पसंती

नदी, सरोवर, खाडी, समुद्राच्या शांत परिसराचे ३६० डिग्री अंश दृश्यांसह फ्लोटेल्स बोटी किंवा जहाजांच्या आकारात ती आढतात. असेच 'फ्लोटेल' उभारण्यासाठी महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाने नवी मुंबईतील बेलापूर-उलवे खाडीची निवड केली आहे. मोकळे आकाश, शांत वाऱ्याच्या झुळूक आणि वाहत्या लाटांसोबत संगीताच्या स्वरांशी एकरूप होऊन दमादम मस्त कलंदर होण्यासाठी पर्यटकांची 'फ्लोटेल'ला पहिली पसंती असते. जगभरात सध्या ही 'फ्लोटेल' विविध आकार आणि आकारात येतात, ज्यामध्ये जर्मनीत काही ठिकाणी ८ ते १२ लोकांच्या बसण्याची क्षमता असते. तर गोव्याच्या फ्लोर दो मार्च येथे १५० लोकांसाठी बार्बी क्यू डोनट्स आहेत.

म्हणून केली नवी मुंबईची निवड

सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी नवी मुंबईत हे 'फ्लोटेल' उभारले जात आहे. कारण या परिसरात लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळ आकार घेत आहे. सी लिंकच्या उभारणीमुळे दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई शहर एकदम जवळ येणार आहे. याच परिसरात जगप्रसिद्ध घारापुरी लेणींसह बेलापूर किल्ला, जेएनपीटी, गेटवे ऑफ इंडिया, रेवस मार्गे अलिबाग जोडले जाणार आहे. यामुळे ‘फ्लोटेल’ उभारण्यासाठी नवी मुंबईतील बेलापूर-उलवे खाडीची निवड केली आहे.

बेलापूर जेट्टीवरून पर्यटकांची ने-आण

बेलापूर-उलवे खाडीच्या परिसरातील नियोजित 'फ्लोटेल'वर पर्यटकांची ने-आण करण्यासाठी बेलापूर जेट्टीवरून केली जाणार आहे. या जेट्टीचा वापर लवकरच मुंबई-नवी मुंबईसह ठाणे-कल्याण-मीरा-भाईंदर-वसईपर्यंतच्या जलवाहतुकीसाठीही होणार आहे. यामुळे महामुंबईतील सर्वच शहरांतील पर्यटकांना नवी मुंबईतील या 'फ्लोटेल'चा लाभ घेणे सोपे होणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईbelapur-acबेलापूरKhadiखादीtourismपर्यटन