‘फ्लेमिंगों’नी उरणकडे फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 01:35 AM2019-11-08T01:35:24+5:302019-11-08T01:35:36+5:30

बदलत्या हवामानाचा परिणाम : पक्षिप्रेमींची होत आहे निराशा

The 'flamingos' turned their back to the desert | ‘फ्लेमिंगों’नी उरणकडे फिरवली पाठ

‘फ्लेमिंगों’नी उरणकडे फिरवली पाठ

Next

उरण : पक्षांसाठी असलेल्या पाणथळी जागा, जलाशये लांबलेल्या आणि अवकाळी पावसामुळे तुडुंब भरली आहेत. परंतु सातत्याने होत असलेल्या हवामानातील बदलामुळे परदेशी स्थलांतर करणाऱ्या विशेषत: फ्लेमिंगो पक्ष्यांनी उरणकडे पाठ फिरवली आहे.फ्लेमिंगोंचं दर्शन दुर्मिळ होऊ लागल्याने मात्र पक्षीप्रेमींमध्ये सध्या तरी निराशेचे वातावरण आहे.

उरणमधील जेएनपीटी परिसरातील पाणजे, डोंगरी, गव्हाण-न्हावा, करंजा खाडी- किनारा आणि पाणथळी जागा, जलाशये स्थलांतरीत पक्ष्यांची आश्रयस्थाने आहेत. पाणथळी आणि जलाशयात खुबे, मासे, शेवाळ, कृमी, किटक आदी पक्ष्यांचे आवडते खाद्य विपूल प्रमाणात उपलब्ध होत असल्याने विविध जातींचे स्थलांतरीत पक्षी या परिसरात मोठ्या प्रमाणात येतात. दरवर्षी पावसाळा संपताच हिवाळ्याच्या सुरुवातीपासूनच परदेशी पक्ष्यांच्या स्थलांतराचा काळ सुरु होतो. या स्थलांतराच्या कालावधीत उरण परिसरातील पाणथळी, जलाशये आणि खाडी किनाऱ्यांवर फ्लेमिंगोसह इतर परदेशी पाहुणे जलचर पक्षी मोठ्या प्रमाणात उरण परिसरात येतात. मोठ्या संख्येने येणाºया विविध जातींच्या आकर्षक स्थलांतरीत पक्ष्यांनी उरण परिसरात अगदी फुलून, बहरुन जातो, विशेषता स्थलांतरीत पक्ष्यांमध्ये हजारो किमी अंतर कापून येणाºया आकर्षक गुलाबी छटा असलेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांची संख्या सर्वाधिक असते. त्यामुळे फ्लेमिंगो पक्ष्यांचे स्वैरपणे हवेत उडणारे थवे पाहण्यासाठी तसेच कॅमेºयात टिपण्यासाठी पक्षीप्रेमींची उरण परिसरात नेहमीच गर्दी होते.

याआधीच उरण परिसरात वाढत्या औद्योगिकरणामुळे विकासाच्या नावाखाली ठिक-ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दगड-मातीचे भराव टाकण्यात आले आहेत. यातून पाणथळी जागा आणि जलाशयेही सुटलेली नाहीत. यामुळे पक्ष्यांची आश्रयस्थाने याआधीच नष्ट झाली आहेत. त्यामुळे उरण परिसरात स्थलांतरीत फ्लेमिंगोसह इतर पक्ष्यांची ही संख्या रोडावली आहे. त्यानंतर आता लांबलेल्या पावसाची भर पडली आहे. शिवाय यावर्षी क्यार, ‘महा’चक्रीवादळ आदी नैसर्गिक संकटाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे सातत्याने होत असलेल्या हवामानातील बदलांमुळे परदेशी स्थलांतर करणाºया विशेषत: फ्लेमिंगो पक्ष्यांनी यावर्षी ऐन हिवाळ्यातच उरणकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे फ्लेमिंगोंचं दर्शन दुर्मिळ झाली असल्याची प्रतिक्रिया पक्षीप्रेमींकडून व्यक्त केल्या जात आहेत.
 

Web Title: The 'flamingos' turned their back to the desert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.