शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

फ्लेमिंगोचे मृत्यूसत्र थांबता थांबेना, आणखी ५ पक्ष्यांचा मृत्यू तर ७ जखमी

By नारायण जाधव | Updated: April 25, 2024 16:06 IST

पर्यावरणप्रेमी हादरले : मँग्रोव्ह सेल चौकशी करणार

नवी मुंबई : डीपीएस तलावाजवळ गुरुवारी पहाटे आणखी पाच फ्लेमिंगो रहस्यमयरीत्या मृतावस्थेत तर सात जखमी अवस्थेत आढळून आल्याने पक्षी आणि पर्यावरणप्रेमी कमालीचे हादरले आहेत. एकट्या नेरूळमध्ये एका आठवड्यात मृत फ्लेमिंगोची संख्या ८ वर पोहोचली आहे. कोरड्या तलावात अन्न न मिळाल्याने ते इतस्तत: भटकून पक्षी विचलित होत असावेत, असा पक्षीप्रेमींचा अंदाज आहे.

मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनी व्हॉट्सॲप ग्रुप्सवर याबाबत ॲलर्ट देताच वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशनचे पक्षी बचावकर्ता सनप्रीत सावर्डेकर आणि त्यांच्या टीमने जखमी गुलाबी पक्ष्यांना ठाण्यातील मानपाडा येथील रुग्णालयात हलवले. तर वनविभागाने सात पक्ष्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते पनवेल येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत, असे परिक्षेत्र वन अधिकारी सुधीर मांढरे यांनी सांगितले. दरम्यान, येथील नॅटकनेक्ट फाउंडेशनने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या घटनांची उच्चस्तरीय चौकशी करून नवी मुंबईतील फ्लेमिंगोंसह जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी योग्य पावले उचलण्याची विनंती केली आहे.

नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार म्हणाले की, ही आजची दुसरी शोकांतिका आहे. गेल्या शुक्रवारी तीन फ्लेमिंगो मृत आणि एक जखमी अवस्थेत आढळला होता. कुमार यांनी १४१ वर्षे जुनी संशोधन संस्था बीएनएचएसकडेदेखील हा मुद्दा उचलून धरला आहे तसेच नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि राज्य मँग्रोव्ह सेलला याबाबत सतर्क केले आहे. डीपीएस तलाव नेहमीच एक आंतर-भरतीसंबंधीचा ओलसर जमीन, पाण्याचे प्रवेश अवरोधित केल्यामुळे कोरडा राहते. नेरूळ जेट्टीच्या रस्त्याखाली तलावाच्या दक्षिणेकडील एक भाग रस्त्यात गाडला गेला असून ही जलवाहिनी पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे, असे कुमार म्हणाले.

अभ्यासाठी पथक येणारअतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक व्ही. एस. रामाराव म्हणाले की, परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आणि कारवाई सुचवण्यासाठी एक पथक घटनास्थळी पाठवले जाईल. तर सेव्ह फ्लेमिंगोज अँड मँग्रोव्हज फोरमच्या रेखा सांखला यांनीही तलावातील पाण्याचा प्रवाह पुन्हा सुरू करण्याची विनंती महापालिकेसह सिडकोला केली आहे.

बीएनएचएसही फ्लेमिंगोंच्या आरोग्यासाठी आग्रहीबीएनएचएसचे उपसंचालक डॉ. राहुल खोत यांनीही फ्लेमिंगो रस्त्यावर येणा-या घटना आणि त्यांच्या मृत्यूबद्दल खेद व्यक्त केला आहे. तसेच आमची संस्था नवी मुंबईतील पाणथळ जागा योग्य आरोग्यासाठी राखण्यासाठी आग्रही असल्याचे सांगून भरतीच्या वेळी ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात येथून पक्षी येथे येत असल्याचे सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई