शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

धान्य मार्केटमधील समस्या सोडवा, व्यापाऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 23:54 IST

बाजार समितीच्या धान्य मार्केटमधील समस्या सोडविण्यासाठी ग्रोमा संघटनेने प्रशासनासोबत बैठकीचे आयोजन केले होते.

नवी मुंबई : बाजार समितीच्या धान्य मार्केटमधील समस्या सोडविण्यासाठी ग्रोमा संघटनेने प्रशासनासोबत बैठकीचे आयोजन केले होते. मार्केटमधील प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.एपीएमसीला सर्वाधिक उत्पन्न धान्य मार्केटमधून मिळत आहे; परंतु येथील समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी ग्रोमा संघटना, शिवसेना उपनेते विजय नाहटा व बाजार समिती प्रशासन यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. मार्केटमधील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात यावी. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. पाणी, रस्ते, वीज व गटाराची समस्या सोडविण्यात यावी, अशी मागणी या वेळी व्यापाऱ्यांनी केली. प्रशासन सतीश सोनी यांनी सांगितले की, रोड बनविण्याचे १३ कोटींचे काम सुरू आहे. प्रशासनाला दहा लाख रुपयांच्या आतमध्ये खर्च करण्याचा अधिकार आहे. या मर्यादेत राहून जास्तीत जास्त विकासकामे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे या वेळी सांगण्यात आले. विजय नाहटा यांनीही प्रशासनाला प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या सूचना केल्या. सीसीटीव्ही बसविण्यासाठी खासदार निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. पाणीसमस्या सोडविण्यासाठी महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्याचे आश्वासनही दिले.बाजार समितीमध्ये झालेल्या या बैठकीला ग्रोमाचे अध्यक्ष शरद मारू, बाजार समितीचे प्रशासक सतीश सोनी, सचिव अनिल चव्हाण व ग्रोमाचे इतर पदाधिकारीही उपस्थित होते.