ठाणे : शहराच्या पूर्व भागातील कोपरी येथील सिद्धिविनायक चाळीत राहणाऱ्या बंगलेकर यांच्याकडे घरफोडीचा प्रकार घडला. त्यात चोरट्यांनी चार लाख ९४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. विमल बंगलेकर या त्यांच्या मुलीसह नेरूळ येथे दातांवर उपचार करण्यासाठी गेल्या होत्या. त्याच वेळी ही चोरी झाली. कोपरी पोलीस या चोरीचा तपास करत आहेत. बंगलेकर या त्यांची मुलगी दीप्तीसह २५ डिसेंबरला सायंकाळी ४.३० च्या सुमारास बाहेर गेल्या होत्या. त्याच दरम्यान काही चोरटे कुलूप तोडून त्यांच्या घरात घुसले. त्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा चार लाख ९४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आणि पसार झाले. या माय-लेकी घरी परतल्या तेव्हा त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे आढळले. त्यांनी याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी ४.३० वा. च्या सुमारास कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक एच.जी. देटके हे या चोरीचा तपास करीत आहेत. अशा प्रकारच्या घरफोड्यांचे प्रकार शहरात वाढले आहेत. (प्रतिनिधी)
कोपरी येथे पाच लाखांची घरफोडी
By admin | Updated: December 28, 2014 01:56 IST