शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सूर्या नदीवर बांधणार पाच कोकण पद्धतीचे बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 00:41 IST

घोळ येथील बंधाऱ्याचे झाले उद्घाटन; एकूण ५० कोटींचा होणार खर्च

कासा : सूर्या नदीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे काेकण पद्धतीचे पाच बंधारे बांधले जाणार आाहेत. पालघर जिल्ह्यातील सूर्या धरण प्रकल्पांतर्गत कवडास उन्नयी बंधाऱ्याच्या अधोभागात सूर्या नदी पात्रात डहाणू तालुक्यात घोळ आंबिवली, उर्से व पालघर तालुक्यातील चिंचारे व गारगाव अशा पाच ठिकाणी हे बंधारे बांधण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे ५० कोटींचा खर्च केला जाणार आहे.घोळसाठी सहा कोटी ७५ लाख, आंबिवली सात कोटी २३ लाख, उर्से दहा कोटी ७० लाख, चिंचारे १३ कोटी ९९ लाख, गारगाव सात कोटी ३७ लाख मंजूर झाला आहे. आंबिवलीच्या बंधाऱ्याची साठवणूक क्षमता ०.५४४ द.ल.घ.मी., उर्से ०.७४८ दलघमी, गारगाव ०.६४४ दलघमी, घोळ ०.१६२ दलघमी, चिंचारे ०.१९२ दलघमी एवढी आहे. तर एकूण २.२९ दलघमी एवढी आहे. सूर्या नदीवरील घोळ येथील बंधाऱ्याचे उद्घाटन नुकतेच पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी केले. यावेळी गावित यांनी या बंधाऱ्याचा नजीकच्या गावातील नागरिकांना फायदा होणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार श्रीनिवास वनगा, पं.स.सदस्य अरुण कदम, कासा सरपंच रघुनाथ गायकवाड, उपसरपंच मनोज जगदेव व नागरिक उपस्थित होते.पाण्याची पातळी वाढणारबंधाऱ्यामुळे पाण्याची पातळी उन्हाळ्यात वाढणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच या पाण्यातून उन्हाळ्यात येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी वापर होणार असून, या भागातील पाण्याची भूजल पातळी वाढणार आहे. तसेच येथील नागरिकांना नदी पार करण्यासाठी बंधाऱ्यावर रस्ता साडेतीन ते चार मीटर ठेवला जाणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.