शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

नवी मुंबईतून मार्चमध्ये ‘टेकऑफ’ : राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 09:16 IST

दि. बा. पाटलांच्या नावास प्रतिसाद

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटी असणारे देशातील पहिले विमानतळ असेल. या विमानतळावरून मार्च २०२५ मध्ये पहिल्या विमानाचे टेकऑफ होईल, असा विश्वास नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.  केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्यासोबत मोहोळ यांनी शनिवारी विमानतळ प्रकल्पाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला.  विमानतळाला स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे.

विमानतळ प्रकल्पासाठी वेगवेगळ्या संस्था काम करीत असून तिची जबाबदारी आखून दिली आहे. त्यादृष्टीने काम सुरू आहे. रखडलेल्या या प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला आहे. त्याचा पहिला टप्पा मार्च २०२५ मध्ये पूर्ण करण्याचा निर्धार केंद्र शासनाने केला आहे.  

विमानतळाची वैशिष्ट्ये

नवी मुंबई विमानतळ पाच टप्प्यांत उभारले जाणार आहे. टप्पा क्रमांक १ आणि २ एकत्रित पूर्ण केले जाणार आहे. यात एक टर्मिनल आणि एक रन वे असणार आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत हा टप्पा व्यावसायिक वापरासाठी खुला होईल. याअंतर्गत २ कोटी प्रवासी प्रवास करू शकतील, असा अंदाज आहे. टप्पा क्रमांक ३, ४ आणि ५ मध्ये तीन टर्मिनल आणि एक रन वे असणार आहे. या टप्प्यानंतर वार्षिक ९ कोटी प्रवासी वाहतूक होईल, असा अंदाज आहे.

विविध संस्थांना दिलीय डेडलाईन 

विमानतळ प्रकल्पासाठी वेगवेगळ्या संस्था काम करीत असून प्रत्येकाला तिची जबाबदारी आणि डेडलाइन आखून दिली आहे. त्यादृष्टीने काम सुरू आहे. 

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी विमानतळ प्रकल्पाच्या कामावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.  तीन महिन्यांत त्यांनी जवळपास आठ ते दहा वेळा या प्रकल्पाला भेट देऊन कामाची पाहणी केली आहे. 

शनिवारी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या भेटीप्रसंगी विजय सिंघल यांच्यासह सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल, खासदार श्रीकांत शिंदे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचे जीत अदानी, मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीजेके शर्मा उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळmurlidhar moholमुरलीधर मोहोळ