शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

पालिका आयुक्तांच्या निवासस्थानात आग, थोडक्यात टळली मोठी दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 00:33 IST

Fire at the residence of the Municipal Commissioner in Navi Mumbai : सोमवारी दुपारी पालिका आयुक्त पालिका मुख्यालयात असताना ही दुर्घटना घडली.

नवी मुंबई : नेरुळ येथील पालिका आयुक्तांच्या निवासस्थानात आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने त्या ठिकाणी जाऊन आग आटोक्यात आणली. त्या ठिकाणच्या मीटर रूममध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचे समोर आले आहे.सोमवारी दुपारी पालिका आयुक्त पालिका मुख्यालयात असताना ही दुर्घटना घडली. पालिका आयुक्तांच्या निवासस्थानातून धुराचे लोट दिसू लागल्याने, परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. दरम्यान, निवासस्थानातील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाला तत्काळ कळवल्याने नेरुळचे बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, आयुक्तांच्या परिवाराला सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. निवासस्थानात प्रवेशद्वारावरच असलेल्या मीटर रूममध्ये आग लागली होती. आठवड्यापूर्वीच आयुक्त निवासस्थानाच्या रंगरंगोटीचे काम करण्यात आले आहे, तर विद्युत मीटर रूममध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीची माहिती मिळताच तत्काळ वीजपुरवठा खंडित करून व पाण्याचा मारा करून आग विझविण्यात आली, तर घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. सुदैवाने या आगीमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई