शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात दुर्घटना घडते तेव्हाच येते महापालिकेला जाग, आग प्रतिबंधक यंत्रणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 03:02 IST

माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून नावलौकिक प्राप्त झालेल्या नवी मुंबईकरांत आग सुरक्षेबाबत कमालीची उदासीनता असल्याचे दिसून आले आहे.

नवी मुंबई - माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून नावलौकिक प्राप्त झालेल्या नवी मुंबईकरांत आग सुरक्षेबाबत कमालीची उदासीनता असल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून शहरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांत नियमाने बंधनकारक असलेली आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित केली नसल्याचे समोर आले आहे. अशा गृहनिर्माण सोसायट्यांना महापालिकेच्या वतीने वारंवार नोटिसा बजावल्या जातात. मात्र, सोसायट्यांकडून या नोटिसांना केराची टोपली दाखविली जाते. विशेष म्हणजे, आगीची एखादी दुर्घटना घडली की, महापालिकेला या संदर्भात पुन्हा जाग येते. त्यानंतर पुन्हा नोटिसा बजावण्याचा सोपस्कार पूर्ण केला जातो. ठोस कार्यवाहीला बगल देत दोन्ही घटकांकडून आपली जबाबदारी आणि कर्तव्यात कसूर केली जात असल्याने शहरात आग प्रतिबंधक यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे.गेल्या आठवड्यात ऐरोली येथील एका बहुमजली इमारतीच्या बाविसाव्या मजल्यावरील घराला आग लागल्याची घटना घडली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे, या इमारतीतही आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेनंतर महापालिका पुन्हा खडबडून जागी झाली आहे. आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित नसलेल्या गृहनिर्माण सोसायट्या आणि वाणिज्य संकुलांना आवाहन केले आहे. आगप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित न करणाऱ्या इमारतींचा पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा खंडित करण्याचे अधिकार महापालिकेला आहेत, असे असतानाही आग प्रतिबंधक यंत्रणेबाबत उदासीनता दाखविणाºया संस्थांच्या विरोधात कारवाई होताना दिसत नाही. एखादी दुर्घटना घडली की, वृत्तपत्रातून जाहीर आवाहन करायचे किंवा पुन्हा संबंधित सोसायट्यांना नोटिसा बजावायच्या, ही महापालिकेची या संदर्भातील कार्यपद्धती बनली आहे.लघु-उद्योजकांनाही वावडेमहापालिका कार्यक्षेत्रातील लघु-उद्योजकांनाही आग प्रतिबंधक यंत्रणेचे वावडे असल्याचे दिसून आले आहे. अनेकांनी अग्निशमन नियमांना हरताळ फासला आहे. विशेषत: एमआयडीसीतील अनेक कंपन्यांत आजही आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे शहरात निवासी व व्यावसायिक असा संमिश्र वापर असलेल्या वसाहतीतही या यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका