शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

Nerul Meridian Fire Video : मॅरेडियन टॉवरमध्ये आग, चीनी युवकांचे पासपोर्ट अन् कागदोपत्रे जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 02:16 IST

Breaking News by Lokmat : Nerul Meridian Fire Nerul Meridian Fire : शहरातील नेरुळ सेक्टर 6 येथे पामबीचरोडवरील मॅरेडियन टॉवरमध्ये अचानक आग लागली आहे.

Breaking News by Lokmat : Nerul Meridian Fire

नवी मुंबई - शहरातील नेरुळ सेक्टर 6 येथे पामबीच रोडवरील मेरेडीअन टॉवरमध्ये अचानक आग लागली. या टॉवरमधील 14 व्या मजल्यावर ही आग भडकली असून अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमनच्या जवानांनी आग आटोक्यात आणली असून सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही इजा झाली नाही. मात्र, फ्लॅटमधील सामान जळून खाक झाले आहे. याबाबतचे वृत्त सर्वात आधी लोकमतने दिले आहे.  

नेरुळच्या पामबीच रोडवरील मॅरेडियन टॉवरमधील 14 व्या मजल्यावर रात्री 10.45 वाजता अचानक आग भडकली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, सुरुवातीला आलेल्या दोन गाड्यांमध्ये हायड्रोक्लिक शिडी नसल्याने आग विझविण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला. अखेर, तिसऱ्या गाडीत हायड्रोक्लिक शिडी (क्रेन) आल्यानंतर इतर टँकरच्या सहाय्याने पाण्याचा उंच मारा करुन ही आग आटोक्यात आणण्यात आली.  

मॅरेडियन टॉवरच्या 14 व्या मजल्यावरील आग लागलेला हा फ्लॅट दोन चीनी युवकांना भाड्याने देण्यात आला आहे. सुदैवाने आग लागली तेव्हा फ्लॅटमध्ये कुणीही नव्हते. सध्या, या फ्लॅटमध्ये दोन चायनीज युवक राहात असून ते जवळच राहणाऱ्या आपल्या मित्रांकडे जेवणासाठी गेले होते. त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. सुरुवातीला आग भडकल्यानंतर जवळपास एक ते दीड तास फ्लॅटमध्ये आग भडकली. त्यामुळे फ्लॅटमधील सामान जळून खाक झाले आहे. विशेष म्हणजे, फ्लॅटमधील या दोन चीनी युवकांचे पासपोर्ट, व्हिसा आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांचीही राख झाली आहे. दरम्यान, पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली असून रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरुच होते.  

पाहा व्हिडीओ - 

टॅग्स :fireआग