शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

कोपरखैरणेत माथाडी रुग्णालय परिसराला समस्यांचा विळखा

By admin | Updated: May 30, 2017 06:31 IST

कोपरखैरणेतील माथाडी रुग्णालयाच्या नव्या इमारत परिसराला समस्यांनी विळखा घातला आहे. वसाहतीअंतर्गत खासगी ट्रॅव्हल्सला

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोपरखैरणेतील माथाडी रुग्णालयाच्या नव्या इमारत परिसराला समस्यांनी विळखा घातला आहे. वसाहतीअंतर्गत खासगी ट्रॅव्हल्सला परवानगी नसतानाही त्याठिकाणी अवैध बसथांबा तयार झालेला आहे. त्याठिकाणी रात्री उशिरापर्यंत प्रवासी जमत असल्यामुळे फेरीवाल्यांनीही पदपथावर अतिक्रमण केले आहे.कोपरखैरणेत सर्वात मोठी माथाडी कामगारांची वसाहत आहे. त्यांच्या सोयीसाठी जुन्या माथाडी कामगार रुग्णालयापासून काही अंतरावरच तीन टाकी चौकालगत नवे रुग्णालय उभारण्यात आले आहे. लवकरच हे रुग्णालय सुरू होण्याच्या स्थितीत आहे. परंतु रुग्णालय सुरू होण्यापूर्वीच त्याभोवतीचा परिसर समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. वाशी हायवे, सानपाडा हायवे पाठोपाठ कोपरखैरणे तीन टाकी चौकात खासगी ट्रॅव्हल्सचा अवैध बसथांबा तयार झाला आहे. मध्यरात्री उशिरापर्यंत त्याठिकाणी ट्रॅव्हल्सच्या रांगा लागलेल्या असतात. यामुळे इतर वाहनांना रहदारीला अडथळा होत आहे. तर ट्रॅव्हल्सने प्रवास करण्याच्या निमित्ताने त्याठिकाणी मोठ्या संख्येने प्रवासी जमा होत आहेत. याची संधी साधूनच रुग्णालय इमारतीच्या प्रवेशद्वारावरच अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. त्याठिकाणी भुर्जी पाव तसेच इतर खाद्यपदार्थ उघड्यावर बनवून विकले जात आहेत. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ते पहाटेपर्यंत चालणाऱ्या या फेरीवाल्यांची नागरिकांनी अनेकदा पालिकेसह पोलिसांकडे तक्रार केलेली आहे. त्याशिवाय सेक्टर १५ येथील नाक्यावर देखील रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांच्या गाड्या लागलेल्या असतात. परंतु त्यावर कारवाईऐवजी संबंधित तक्रारदारालाच दमदाटी झाल्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. यामुळे त्याठिकाणचा अवैध बसथांबा व अनधिकृत फेरीवाले यांना प्रशासनच पाठीशी घालत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.