शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

प्रकल्पग्रस्तांचे आर्थिक गणित बिघडले; सरकारच्या घोषणेचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 23:29 IST

लॉकडाऊनमुळे घरभाडे थकले; उदरनिर्वाहाचा प्रश्न

- कमलाकर कांबळेनवी मुंबई : लॉकडाऊनच्या काळात घरमालकांनी घरभाडे न आकारण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. याचा सर्वाधिक फटका नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना बसला आहे. शासनाच्या आदेशाचा हवाला देत भाडेकरूंनी दुकाने आणि घरांचे मासिक भाडे देण्यास असमर्थता दर्शविल्याने उदरनिर्वाहाचे हेच एकमेव साधन असलेल्या प्रकल्पग्रस्तांचे कंबरडेच मोडले आहे. मागील तीन महिन्यांपासून भाडेकरूंनी भाडे न दिल्याने अनेकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.लॉकडाऊनमुळे सर्वच घटकांचे आर्थिक समीकरण बिघडले आहे. उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची पाळी आली आहे. हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत झाली आहे. याचा मोठा फटका नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना बसला आहे.नवी मुंबईच्या उभारणीसाठी येथील शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या जमिनी शासनाला दिल्या. शेतजमिनी गेल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन हरवले. जमिनी घेताना दिलेल्या आश्वासनाचा शासनाला विसर पडला. गावठाणांचा विस्तार केला गेला नाही. त्यामुळे वाढत्या कुटुंबाची गरज म्हणून प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मूळ घराच्या जागेवर वाढीव बांधकामे केली. काहींनी घराशेजारच्या रिकाम्या जागा बळकावून त्यावर टोलेजंग इमारती उभारल्या. यातील काही घरे विकली तर काही भाडेतत्त्वावर दिली गेली आहेत. काहींनी साडेबारा टक्के योजनेअंतर्गत मिळालेल्या भूखंडावर बांधकाम करून त्यातील काही घरे स्वत:साठी ठेवली तर काही भाडेतत्त्वावार दिली. त्यामुळे घरभाडे हे बहुतांशी प्रकल्पग्रस्तांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन बनले आहे. ढोबळ अंदाजानुसार प्रत्येक गावात सरासरी ६0 टक्के प्रकल्पग्रस्तांची गुजराण घर आणि दुकानांच्या मासिक भाड्यातून होते. परंतु कोरोनामुळे उत्पन्नाच्या या प्रमुख साधनालाच कात्री लागली आहे.लॉकडाऊनमुळे नोकºयांवर संक्रात आल्याने भाडेकरूंचीही कोंडी झाली आहे. घराचे भाडे द्यायचे की पोटाची खळगी भरायची, अशा दुहेरी संकटात हा नोकरदार वर्ग सापडला आहे. याची थेट झळ घरमालकांना बसली आहे. घरभाडेच येणार नसेल तर आम्ही आमचे कुटुंब कसे पोसायचे, असा सवाल प्रकल्पग्रस्तांना सतावत आहे.भाडेवसुलीसाठी दमदाटीचे प्रकारलॉकडाऊनमुळे सर्वांचेच आर्थिक गणित बिघडले आहे. याचा सर्वाधिक फटका दुकान आणि घरभाड्यावर मदार असलेल्या प्रकल्पग्रस्तांना बसला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून काहींनी आर्थिक झळ सहन करण्याची मानसिकता बनविली.परंतु आपलेच पैसे आपणाला मिळत नाहीत, ही भावनाच काहींच्या पचनी पडल्याचे दिसत नाही. परिणामी, काही ठिकाणी भाडे वसुलीसाठी भाडेकरूंना दमदाटी केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत.पाणी, विद्युत देयकाचा भुर्दंडलॉकडाऊनमध्ये रोजगार गेल्याने परप्रांतीय चाकरमानी व कष्टकºयांनी कुटुंबासह स्थलांतर केले. घरमालकाला कोणतीही कल्पना न देता अनेक जण आपल्या मूळ गावी निघून गेले. अनेकांनी जाताना घरभाडे तर दूरच पाणी व विद्युत देयकेसुद्धा भरली नाहीत. त्याचा भुर्दंड आता घरमालकांना सहन करावा लागत आहे.लॉकडाऊनमध्ये तीन महिने भाडेकरूंकडून घरभाडे न आकारण्याचे फर्मान सरकारने जारी केले आहे. याचा सर्वाधिक फटका नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना बसला आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. भाडेकरूंचा विचार करणाºया सरकारने सध्या आर्थिक कोंडीत अडकलेल्या ८0 टक्के प्रकल्पग्रस्तांचाही विचार करायला हवा.- विकास पाटील,संस्थापक अध्यक्ष : प्रकाशझोतसामाजिक संस्था, नवी मुंबई