शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर जीवाची बाजी लावणाऱ्या हिराेंना न्याय; २६ अग्निशमन जवानांचा केला सत्कार

By सूर्यकांत वाघमारे | Updated: August 16, 2024 07:15 IST

स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर करण्यात आला सत्कार

सूर्यकांत वाघमारे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: डोंबिवली येथे झालेल्या आगीच्या भीषण दुर्घटनांमध्ये खरी जीवाची बाजी लावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अखेर स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर सत्कार करण्यात आला. त्यांनी लावलेल्या जीवाच्या बाजी अव्हेरून वरिष्ठांनी त्याचे श्रेय अवघ्या तीन अधिकाऱ्यांना देऊन त्यांचा १ ऑगस्टला सत्कार केला होता. याबाबत कर्मचाऱ्यांच्या संघटनेने उद्योग मंत्र्यांकडे खंत व्यक्त करताच प्रत्यक्ष बचावकार्यात सहभागी असलेल्या २६ जणांचा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

डोंबिवली येथे मे महिन्यात भीषण आगीची दुर्घटना घडली होती. कंपनीत झालेल्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू, तर ६६ जण जखमी झाले होते. या बचावकार्यात अंबरनाथ अग्निशमन दलासोबत रबाळे एमआयडीसी, तळोजा एमआयडीसी इथल्या अग्निशमन दलाच्या जवानांनीदेखील जीवाची बाजी लावली होती. मात्र, १ ऑगस्टला एमआयडीसी स्थापना दिनाच्या कार्यक्रमात वरिष्ठांच्या मर्जीतल्या तीन अधिकाऱ्यांना संपूर्ण बचावकार्याचे श्रेय दिले होते. या तीन अधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याबाबत अग्निशमन दलाच्या कर्मचारी संघटनेने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली होती, तर कर्मचाऱ्यांनी मांडलेली वस्तुस्थिती लक्षात येताच उद्योग मंत्र्यांनी बचावकार्यात सहभागी असलेल्या सर्वच अग्निशमन जवानांचा सत्कार करण्याचे सूचित केले होते.  स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी त्या २६ अग्निवीरांचा सन्मान केला. 

उदय सामंत यांचे मानले आभार

सन्मानसोबत त्यांना प्रोत्साहनपर रकमेचा धनादेशदेखील दिला. त्यामध्ये रबाळे एमआयडीसीच्या १२, अंबरनाथच्या ९, तर तळोजातील ५ अधिकारी व जवानांचा समावेश आहे. हा केवळ सत्कार नसून, भविष्यातल्या दुर्घटनांमध्ये परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी दिलेले बळ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली, तर कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेतल्याबद्दल त्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांचेही आभार व्यक्त केले.

टॅग्स :Fire Brigadeअग्निशमन दल