शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

अखेर बेलापूर बंदरात होणार पायाभूत सुविधा; रॅम्प, प्रतीक्षा गृह, तिकीटघरासह पार्किंगची होणार सोय

By नारायण जाधव | Updated: August 7, 2023 18:16 IST

नवी मुंबईतील बेलापूर बंदरातून मुंबई-अलिबाग-वसईकरिता जलवाहतूक सुरू करण्यासाठी जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर येथून गेल्या वर्षी वाहतूकही सुरू केली.

नवी मुंबई : नवी मुंबईतीलबेलापूर बंदरातून मुंबई-अलिबाग-वसईकरिता जलवाहतूक सुरू करण्यासाठी जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर येथून गेल्या वर्षी वाहतूकही सुरू केली. मात्र, तेथे रॅम्प, प्रतीक्षा गृह, तिकीटघर, प्रसाधन गृह, सुरक्षारक्षकांची कॅबिन, पार्किंग सुविधा यासारख्या आणि पायाभूत पुरविण्यासाठी सीआरझेडने मेरी टाईम बोर्डास बांधकाम परवानगी मंजूर करून याबाबतचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी परिवेश समितीकडे पाठविला आहे.

गेल्या वर्षी मेरी टाईम बोर्डाने यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, प्रस्तावासोबत त्यांनी ईआयए अर्थात इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट जोडला नव्हता. त्यामुळे सीआरझेडने तेव्हा परवानगी नाकारून ईआयए अर्थात इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट सोडून सुधारित आराखडा पाठवावा, अशी सूचना केली होती. त्यामुळे बेलापूर जेट्टीसह इतर पायाभूत सुविधांचे काम पुन्हा रखडले होते. आता त्यास सीआरझेडने अटी व शर्थी घालून हिरवा कंदील दिला आहे.

बेलापूर येथून प्रवासी जलवाहतूक करण्यासाठी जेट्टी बांधण्याकरिता सीआरझेड प्राधिकरणाने मार्च २०१९ मध्ये परवानगी दिली होती. यानंतर केंद्रीय नौकानयन मंत्री सरबानंद सोनोवाल यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये येथील अनेक कामे अपूर्ण असतानाच जलवाहतूक सेवा आणि जेट्टीचे उद्घाटन केले होते. मात्र, अवाजवी भाडे असल्याने ही जलवाहतूक सेवा बंद झाली आहे. तसेच रॅम्प आणि पायाभूत नसताना जलवाहतूक सेवा सुरू करण्याची घाई कशासाठी, रॅम्प आणि पायाभूत सुविधांअभावी अपघात झाल्यास त्यास जबाबदार काेण, असा प्रश्न यामुळे विचारण्यात येत होता.

अशी होणार कामे1- प्रवासी, कर्मचाऱ्यांची वाहनांची पार्किंग स्टँड- ९५ बाय २५ मीटर2- हॉवरक्राफ्ट पार्किंग स्टँड- २० बाय २५ मीटर3- हॉवरक्राफ्टसाठी रॅम्प- २९ बाय १३ मीटर याशिवाय येथे प्रतीक्षा गृह, तिकीटघर, प्रसाधन गृह, सुरक्षारक्षकांच्या कॅबिनचे काम प्रस्तावित केले आहे. पनवेल खाडीत पश्चिम पूर्वेला वाघिवली गावाच्या समोर ठाणे खाडी दिवाळे गावाजवळ जेथे मिळते, त्या ठिकाणी या सुविधा होणार आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईbelapur-acबेलापूर