शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

अखेर दास्तान फाटा ते चिर्ले आणि रांजणपाडा या दोन्ही रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपूलांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2023 20:44 IST

वाहतुकीची समस्या दूर होण्यास मदत होणार 

- मधुकर ठाकूर

उरण : मागील चार वर्षांपासून रखडलेल्या जासई दास्तान फाटा ते चिर्ले रेल्वे क्रॉसिंगवरील १२५० मीटर लांबीचा (१.२ किमी ) आणि रांजणपाडा रेल्वे क्रॉसिंग या दोन्ही उड्डाण पूलाचे बुधवारी (१६) राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. लोकार्पण सोहळ्यानंतर दोन्ही उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आले आहेत.यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या हजारो नोकरदार, प्रवासी, वाहन चालक यांना दररोजच्या वाहतूक कोंडीचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.

जासई -दास्तान फाटा ते दिघोडे या रस्त्यावरील जासई - चिर्ले रेल्वे क्रॉसिंगवरुन दररोज जड-अवजड आदी हजारो वाहनांची वर्दळ असते.मात्र दर २० मिनिटांनी धावणाऱ्या मालवाहू रेल्वेमुळे  या मार्गावरील रेल्वे फाटकावर मोठ्या प्रमाणावर वाहतूकीची कोंडी होत असते. त्यामुळे दास्तानफाटा ते चिर्ले दरम्यान रेल्वे लेव्हल क्रासिंग क्र-२ हा १२५० मीटर लांबीचा आणि ४७.०२ कोटी खर्चाचा तसेच रांजणपाडा रेल्वे लेव्हल क्रासिंग क्र-३ हा १०१० लांबीचा आणि १९.३८ कोटी खर्चाच्या दोन्हीही उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू करण्यात आले होते.या दोन्ही उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाल्यानंतर बुधवारी (१६) राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

उरणचे आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या लोकार्पण सोहळ्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण मावळ खासदार श्रीरंग बारणे, महेश बालदी यांनी मनोगत व्यक्त केले. मनोगतांतुन त्यांनी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे.यामुळे वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर सुटण्यास मदत झाली आहे.राज्यात आणि केंद्रात दोन्ही सरकारे जनतेच्या हिताच्या कामासाठीच अधिक प्राधान्य देत असल्याचेही मनोगतातून व्यक्त केले. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :railwayरेल्वे