शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अखेर १३ कर्मचारी बडतर्फ

By admin | Updated: June 24, 2016 03:50 IST

महानगरपालिका परिवहन उपक्रमातील १३ कायमस्वरूपी सेवेतील चालक व वाहकांना बडतर्फ करण्यात आले आहे. यापूर्वी २१२ कंत्राटी कामगारांनाही सेवेतून काढून टाकले

नवी मुंबई : महानगरपालिका परिवहन उपक्रमातील १३ कायमस्वरूपी सेवेतील चालक व वाहकांना बडतर्फ करण्यात आले आहे. यापूर्वी २१२ कंत्राटी कामगारांनाही सेवेतून काढून टाकले असून १४ पर्यवेक्षकांना कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेमधील बेशिस्तपणा मोडीत काढण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत सर्वाधिक बेशिस्तपणा परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांमध्ये निदर्शनास आला होता. अनेक चालक व वाहक एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी सुटीवर जात असल्याचे निदर्शनास आले होते. कायम कर्मचारीही वारंवार सुट्यांवर जात होते. आयुक्तांनी एनएमएमटीचा आढावा घेवून बेशिस्तपणा करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. रोजंदारीवरील २१२ चालक व वाहकांना सेवेतून कमी केले आहे. कायमस्वरूपी सेवेत असलेल्या २५ चालक व वाहकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यामध्ये वाहक सुनील माने, संजय गावडे, कुमार पवार, सुभाष शिंगे, पांडुरंग पारधी, दिलीप खुरकुटे, बापू गावित, शरद पारधी, विष्णू पालवे, यांच्यासह बसचालक अर्जुन मसुगडे, रामचंद्र म्हसकर, अनंता जाधव व सुधीर पवार यांचा समावेश आहे. उपक्रमातील १४ पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांची जलदगतीने चौकशी करून कारवाई केली जाणार आहे. आयुक्तांच्या धडक कारवाईमुळे उपक्रमाच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली. परिवहन उपक्रमाविषयी प्रवाशांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण केले जात आहे. ऐरोली, डोंबिवली, व कल्याण परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी वाहतूक शाखा व आरटीओच्या मदतीने कारवाई सुरू केली असून यामुळे उपक्रमाच्या उत्पन्नात वाढ होवू लागली आहे.