शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

सार्वजनिक बांधकाम विभागावर गुन्हा दाखल, निष्काळजीपणाचा ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 07:01 IST

सायन - पनवेल महामार्गावर सानपाड्याजवळ जुई पुलावर शनिवारी रात्री अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला. एक वर्षात ६ जणांचा मृत्यू झाला असून ५० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.

नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गावर सानपाड्याजवळ जुई पुलावर शनिवारी रात्री अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला. एक वर्षात ६ जणांचा मृत्यू झाला असून ५० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. दोन वर्षात ५० वेळा पत्रव्यवहार करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे त्यांच्याविरोधात वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी राज्य शासनाने सायन - पनवेल महामार्गाचे रुंदीकरण केले. परंतु अनेक वर्षांपासून अपघात होत असलेल्या ठिकाणी काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. यामध्ये सानपाड्याजवळील जुई पुलाचा समावेश आहे. पुलाचा जुना व नवीन भाग जोडण्यासाठी ७० ते ८० मीटर लांबीचा लोखंडी रॉल बसविण्यात आला आहे. दोन्ही रॉडमध्ये ७ इंचाचा फरक आहे. याठिकाणी मोटारसायकल घसरून अपघात होत आहे. रोडवर पडलेला मोटारसायकलस्वार स्वत:ला सावरेपर्यंत मागून येणाºया वाहनांची धडक बसून त्याचा मृत्यू होत आहे. शनिवारी सायंकाळी अपघात होऊन मुदस्सर नागरबावडी यांचा मृत्यू झाला. २८ फेब्रुवारीलाही या ठिकाणी अपघात होऊन मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला होता. महिन्यातून चार ते पाच गंभीर अपघात याठिकाणी होऊ लागले आहेत.जुई पुलावर होणाºया अपघाताविषयी वाशी वाहतूक पोलिसांनी २०१६ पासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. जवळपास ५० वेळा पत्रे व स्मरणपत्रे दिली आहेत. अनेक मिटिंगमध्ये या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले आहे. प्रसारमाध्यमांनीही या विषयावर आवाज उठविला आहे. यापूर्वी नागरिकांनी याठिकाणी आंदोलनही केले होते, परंतु यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येकडे लक्ष दिलेले नाही.येथे होणाºया अपघाताला त्यांनाही जबाबदार धरून त्यांच्यावर वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.महामार्गावर जुई पुलावरील समस्येविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे, परंतु प्रशासनाने दुरुस्तीची कामे केली नसल्याने वारंवार अपघात होत आहेत. दुरुस्तीची कामे तत्काळ केली नाहीत तर अपघातांचे सत्र सुरूच राहणार आहे.- सतीश गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाशी वाहतूक 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई