शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
4
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
6
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
7
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
8
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
9
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
10
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
11
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
12
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
13
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी
14
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
15
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
16
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
17
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
18
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
19
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
20
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...

दारू अड्ड्यांवर धाडसत्र

By admin | Updated: December 17, 2015 02:01 IST

शहरातील जुगारासह मटक्याचे अड्डे बंद केल्यानंतर पोलिसांनी चायनीज सेंटर व दारू विक्रीच्या दुकानाबाहेर मद्यप्राशन करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. मद्य विक्रेत्यांसह

- सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबई

शहरातील जुगारासह मटक्याचे अड्डे बंद केल्यानंतर पोलिसांनी चायनीज सेंटर व दारू विक्रीच्या दुकानाबाहेर मद्यप्राशन करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. मद्य विक्रेत्यांसह पिणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत दोन ठिकाणी धाडी टाकून ३५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील सर्व अवैध व्यवसाय बंद करण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे. परिमंडळ एकचे उपायुक्त शहापी उमाप यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बहुतांश सर्व जुगार व मटक्याचे अड्डे बंद केले आहेत. उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहन बगाडे व इतर कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार केले आहे. या पथकाने केलेल्या कारवाईमुळे आयुक्तालयाची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच सर्व जुगार अड्डे बंद झाले आहेत. शहरात बहुतांश बियर शॉपी, दारू विक्री दुकानाच्या बाहेरच बिनधास्तपणे मद्यपान सुरू असते. रेल्वे स्टेशन व अनेक रहदारीच्या ठिकाणी दारू विक्रीची दुकाने असून मद्यपींचा नागरिकांना विशेषत: महिलांना त्रास होवू लागला आहे. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेवून पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वी ऐरोली सेक्टर २० मधील शालीन बिअर शॉपच्या बाजूच्या शेडमध्ये दारू अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून ७ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. १२ डिसेंबरला दिघामधील ईश्वर नगर परिसरात धाड टाकून मद्य पिणारे २५ व विकणाऱ्या तिघांवर कारवाई केली आहे. सदर ठिकाणावरून २२० दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. पोलिसांनी पंधरा दिवसांमध्ये तब्बल ३५ जणांवर कारवाई केल्यामुळे उघड्यावर दारू विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. अनेकांनी कारवाईपासून सुटका व्हावी यासाठी दुकानाच्या दर्शनी भागात दुकानासमोर दारू पिण्यास मनाई असल्याची पाटी लावली आहे. परंतु अशी पाटी लावली असली तरी प्रत्यक्षात मात्र दारू पिणाऱ्यांना पाठीशी घालण्याचे प्रकार सुरूच आहे. बियर शॉपच्या मालकांनी दुकानाबाहेर दारूच्या जाहिरातीच्या कमानी तयार केल्या असून त्याठिकाणी मद्यप्राशन सुरू असते. नेरूळ, शिरवणे, जुहूगाव, कोपरखैरणे, घणसोली व इतर ठिकाणीही चायनीज सेंटरवर बिनधास्तपणे मद्यविक्री सुरू असते. या सर्व अड्ड्यांवर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनीही अशाप्रकारचे अवैध व्यवसाय कुठे सुरू असतील तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन केले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांवरही कारवाईउघड्यावर मद्यप्राशन सुरू असताना स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारीही त्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. नेरूळ रेल्वे स्टेशन, एपीएमसी व इतर अनेक ठिकाणी नागरिकांनी तक्रारी करूनही पोलिसांनी दखल घेतलेली नाही. नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही कारवाई करावी अशी लेखी तक्रार पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सामाजिक कार्यकर्त्यांनी केली असून बियर शॉपीवाल्यांना पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली आहे. शहरातील बियर शॉप चालकांना बियर विकण्याचा परवाना आहे. परंतु अनेकांनी दुकानाबाहेर शेड तयार करून तेथेच मद्यप्राशन करण्यास परवानगी दिली आहे. उघड्यावर दारू, बियर पिणे कायद्याने गुन्हा असून कुठेही अशाप्रकारचा प्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ कारवाई केली जाणार आहे. - शहाजी उमाप,पोलीस उपआयुक्त, परिमंडळ १