शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगसाठी नवी मुंबईत मारामाऱ्या आणि खून...; वाहन उभे करण्यावरून सतत भांडणे, पार्किंग करायची कुठे?

By नामदेव मोरे | Updated: January 5, 2024 12:05 IST

रेल्वे स्थानके वगळता कुठेच वाहनतळाची सोय नसल्यामुळे ही वाहने कुठे उभी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पार्किंगच्या प्रश्नावरून भांडणे वाढली असून ती मारामारीपासून खून करण्यापर्यंत विकोपाला गेली आहेत.

नवी मुंबई : सुनियोजित नवी मुंबईमध्ये पुरेशा वाहनतळांची निर्मिती करण्यास सिडकोसह महापालिकेला विसर पडला आहे. शहरातील नोंदीत वाहनांची संख्या पाच लाख ६२ हजारांपेक्षा जास्त झाली आहे. रेल्वे स्थानके वगळता कुठेच वाहनतळाची सोय नसल्यामुळे ही वाहने कुठे उभी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पार्किंगच्या प्रश्नावरून भांडणे वाढली असून ती मारामारीपासून खून करण्यापर्यंत विकोपाला गेली आहेत.

नवी मुंबईमधील तुर्भे स्टोअर्स परिसरामध्ये ८ ऑगस्टला पार्किंगवरून झालेल्या वादातून रिक्षाचालकाचा खून करण्यात आला. ऑक्टोबरमध्ये नेरूळमध्ये पार्किंगच्या वादातून एकास मारहाण झाली होती. महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये वाहने उभी करण्यावरून अशा प्रकारची भांडणे रोज होत आहेत. वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असून वाहने उभी करण्यासाठी वाहनतळाचे नियोजनच केले जात नाही. यामुळे जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जात असून पार्किंगचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे.

शहरात साडेपाच लाखांहून अधिक वाहने- दहा वर्षांपूर्वी शहरातील वाहनांची संख्या तीन लाख एक हजार ७३१ एवढी होती. दहा वर्षांत ही संख्या तब्बल पाच लाख ६२ हजार ८९१ झाली आहे.- शहरातील निवासी बांधकामांची संख्या दाेन लाख ६३ हजार आहे. याचाच अर्थ प्रत्येक कुटुंबामागे सरासरी दोनपेक्षा जास्त वाहने शहरात आहेत. - ही वाहने उभी करण्यासाठी सिडकोने व महानगरपालिकेने पुरेशा वाहनतळांची निर्मिती केलेलीच नाही.- रेल्वे स्थानक वगळता इतर ठिकाणी वाहनतळच नाहीत. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जात आहेत. अनेक ठिकाणी पदपथांवरही वाहने उभी करावी लागत आहेत. - एपीएमसी परिसरात रोडवर दोन रांगेत वाहने उभी केली जात असून वाहतुकीसाठी एकच लेन मिळत आहे. - सानपाडा, इंदिरानगर, एपीएमसीमधील जोड रस्त्यांचा वापरही पार्किंगप्रमाणे करावा लागत असून वाहनतळाचा प्रश्न सोडविण्याचे आव्हान पोलिस, सिडको व महानगरपालिकेसमोर उभे राहिले आहे.

महानगरपालिकेमध्ये प्रत्येक विभागात वाहनतळ विकसित करण्यासाठीचे सर्वेक्षण सुरू केले आहे. सीबीडीमध्ये वाहनतळाचे काम पूर्ण झाले असून शहराची पार्किंग पॉलिसी तयार करण्याचे काम सुरू आहे.-राजेश नार्वेकर, आयुक्त, महानगरपालिका

महानगरपालिकेच्या सोबत पार्किंगचे नियोजन करण्यासाठीच्या बैठका सुरू आहेत. वाहनतळांचे नियोजन केले जात असून अवजड वाहनांसाठी पुरेशा वाहनतळांची गरज आहे.- तिरुपती काकडे, पोलिस उपायुक्त वाहतूक

वर्षनिहाय वाढलेल्या वाहनांची संख्यावर्ष     नोंदीत वाहने२०१४    २९,९२७२०१५    ३८,५९४२०१६     ४५,७११२०१७     ४१,६८७२०१८     ४१,९०१२०१९     ४३,०४५२०२०     ३६,४६०२०२१     २४,३५१२०२२     ६१,७८६२०२३     ३७,६८९

नवी मुंबईमधील वाहनांची संख्यावाहन प्रकार     २०१३-१४         २०२२-२३दुचाकी         १,४०,०७२        २,९३,८८८कार             ८९,३६०         १,३९,६३३जीप             ४,०७३        ४,०७०स्टेशन वॅगन    ५७०         ५६९ मीटर टॅक्सी     ८५            ७३५ टुरिस्ट टॅक्सी     ७,६६५        १६,७३४रिक्षा         १२,०९१        ३५,४७०स्टेज कॅरिजेस    ६९            ३४१ कॉन्टॅक्ट कॅरिजेस - ३,१४७        ३,७४१स्कूल बस             ६५६     १,०१५प्रा. स. व्हे.     २८५         ३६२ रुग्णवाहिका    २६६         ३५६ ट्रक             १२,६२३        १७,२७९टँकर         ४,४८३         ५,४६६डिलिव्हरी व्हॅन     १८,६८७         ३२,८८७ट्रॅक्टर         ३३             ५९ ट्रेलर्स         ३,४०२         ३,१०७इतर         ४,१६४         ४,२५८एकूण         ३,०१,७३१        ५,६२,८९१ 

टॅग्स :Parkingपार्किंगNavi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका