शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गृहप्रकल्पाचा मार्ग मोकळा, सिडकोची पंधरा हजार घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 06:43 IST

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प उत्पन्न गटासाठी सिडकोने प्रस्तावित केलेल्या पंधरा हजार घरांच्या गृहप्रकल्पाला पर्यावरण विभागाचा खोडा बसला आहे. परंतु केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुधारित धोरणामुळे या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी आता सिडकोच्या अंतर्गत समितीची मान्यताही पुरेशी ठरणार आहे. साधारण पुढील पंधरा दिवसांत प्रत्यक्ष कामाचा श्रीगणेशा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- कमलाकर कांबळे नवी मुंबई : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प उत्पन्न गटासाठी सिडकोने प्रस्तावित केलेल्या पंधरा हजार घरांच्या गृहप्रकल्पाला पर्यावरण विभागाचा खोडा बसला आहे. परंतु केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुधारित धोरणामुळे या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी आता सिडकोच्या अंतर्गत समितीची मान्यताही पुरेशी ठरणार आहे. साधारण पुढील पंधरा दिवसांत प्रत्यक्ष कामाचा श्रीगणेशा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.नवी मुंबई क्षेत्रात विविध आर्थिक घटकांसाठी पुढील पाच वर्षांत ५५ हजार घरे बांधण्याचा निर्धार सिडकोने केला आहे. मागील दोन-तीन वर्षांत यापैकी जवळपास पाच हजार घरे बांधण्यात आली आहेत. तर अल्प व अत्यल्प उत्पन्न घटकांसाठी १५ हजार १५२ घरांच्या प्रकल्पाचे नियोजन पूर्ण झाले आहे. ही घरे घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा व द्रोणागिरी या नोडमध्ये बांधली जाणार आहेत. त्यासाठीची निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. सिडकोच्या विविध गृहप्रकल्पांची कामे केलेल्या बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन या कंपनीला या नव्या गृहप्रकल्पाच्या उभारणीचे काम देण्यात आले आहे. पाचही नोडमध्ये एकाच वेळी गृहप्रकल्पाचे काम सुरू करण्याची सिडकोची योजना आहे. परंतु तळोजा येथील गृहप्रकल्पाला पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक असल्याने या कामाला खीळ बसली होती. मात्र दीड लाख चौरस मीटर क्षेत्राचा विकास करण्यासाठी आता पर्यावरण विभागाची परवानगी लागणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. यासंबंधीची परवानगी देण्याचे अधिकार आता महापालिका आणि तत्सम शासकीय प्राधिकरणाला बहाल करण्यात आले आहेत. सिडको ही राज्य शासनाच्या अंगीकृत असलेली स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वानुसार सिडकोने सह व्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांच्या अध्यक्षतेखाली एक अंतर्गत समिती गठीत केली आहे. त्यामुळे सिडकोला आता या गृहप्रकल्पासाठी आणखी वेगळ्या परवानगीची वाट बघावी लागणार नाही. एकूणच पर्यावरण विभागाच्या परवानगीचा विषय संपुष्टात आल्याने बहुप्रतीक्षित गृहप्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.दरम्यान, सिडकोच्या अंतर्गत समितीची परवानगी घेवून नियमानुसार महारेराकडे या प्रकल्पाची नोंदणी केली जाणार आहे. ही प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. एकूणच साधारण पुढील पंधरा दिवसांत या गृहप्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.पंधरा हजार घरांचा हा गृहप्रकल्प अल्प व अत्यल्प उत्पन्न घटकांसाठी आहे. पर्यावरण विभागाच्या मंजुरीअभावी त्याचे काम रखडले होते. परंतु केंद्र सरकारच्या सुधारित धोरणानुसार आता तशा वेगळ्या परवानगीची गरज लागणार नाही. त्यासाठी सिडकोने स्वतंत्र समिती गठीत केली आहे. एकूणच पुढील दोन आठवड्यात या गृहप्रकल्पांच्या कामाला सुरुवात होईल.- भूषण गगराणी,व्यवस्थापकीय संचालक, सिडको

टॅग्स :Governmentसरकार