शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव

By admin | Updated: January 20, 2016 02:11 IST

शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढतच चालला असून गतवर्षात अशा ३३४ प्राण्यांची पालिकेने धरपकड केली आहे. त्यापैकी मालकी हक्क असलेल्या प्राण्यांच्या मालकांकडून

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढतच चालला असून गतवर्षात अशा ३३४ प्राण्यांची पालिकेने धरपकड केली आहे. त्यापैकी मालकी हक्क असलेल्या प्राण्यांच्या मालकांकडून १ लाख ४९ हजार दंड स्वरूपात जमा झाले आहेत.नवी मुंबई महापालिका क्षेत्रात रस्त्यावर भटकणाऱ्या मोकाट जनावरांचे प्रमाण वाढतच आहे. भाजी मार्केट, गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर फिरणाऱ्या या प्राण्यांमुळे पादचाऱ्यांसह वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असतो. अशा जनावरांना पकडण्यासाठी महापालिकेने ठेकेदार नेमले आहे. गतवर्षात एकूण ३३४ जनावरे पकडली आहेत. त्यामध्ये गाय, म्हैस, घोडे, गाढव, शेळ्या, मेंढ्या, डुक्कर अशा प्राण्यांचा समावेश आहे. त्यापैकी ११३ जनावरे मालकी हक्काची असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यातून पालिकेला १ लाख ४९ हजारांची मिळकत झाली.शहरातील अनधिकृत तबेल्यातील जनावरे चरण्यासाठी मोकाट सोडली जातात. सार्वजनिक ठिकाणी भटकणारे हे प्राणीही पालिकेने ताब्यात घेतले. अशा प्रकारे गतवर्षी ८६ गायी-म्हशी, २१ घोडे व गाढव, ३९ शेळ्या-मेंढ्या पकडण्यात आलेल्या आहेत. तर १८८डुक्कर पकडून ते देवनारच्या कत्तलखान्यात पाठवलेली आहेत. तर गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या अशा इतर जनावरांना वाशी गावातील कोंडवाड्यात जमा करून ठरावीक मुदतीनंतर गोशाळेत पाठवण्यात आले आहे. वराह हा घाणीत वाढणारा व उपद्रवी प्राणी असल्याने त्याच्या पालनाला महापालिकेची परवानगी नाही. यामुळे पकडलेले वराह देवनारच्या कत्तलखान्यात पाठवले जातात. दिघा, रबाळे व एमआयडीसी परिसरात अनेकांनी विनापरवाना वराहांचे पालन केलेले आहे. यामुळे त्याठिकाणी कारवाईदरम्यान होणारे वाद टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्तात मोकाट डुक्कर पकडले जात आहेत.