शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

तरण तलावासह स्केटिंग रिंगसाठी शुल्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 01:48 IST

देखभाल दुरुस्तीच्या खर्चासाठी प्रस्ताव

नवी मुंबई : घणसोलीमधील सेंट्रल पार्कमध्ये महापालिकेने स्केटिंग रिंग, फुटबॉल टर्फ, क्रिकेट सराव पीच व अ‍ॅम्पी थिएटर या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. या सुविधांच्या वापरासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये त्याविषयी प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक नोडमध्ये चांगली उद्याने तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. नेरुळमध्ये वंडर्स पार्क, संत गाडगेबाबा उद्यान व इतर चांगली उद्याने तयार केली आहेत. घणसोली परिसरामध्ये सेंट्रल पार्क विकसित करण्यात आले आहे. उद्यानाचे काम पूर्ण झाले असून तेथील प्रकल्पग्रस्तांच्या घरांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नामुळे उद्घाटन रखडले आहे. जवळपास ३८ एकर क्षेत्रफळावर हे उद्यान उभारण्यात आले आहे. त्यामध्ये आकर्षक मानवी पुतळ्यांसह स्केटिंग रिंग, फुटबॉल टर्फ, क्रिकेट सराव पीच व अ‍ॅम्पी थिएटर ही सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. उद्यानाच्या देखभालीवरही महिन्याला लाखो रुपये खर्च करावे लागणार आहेत. खर्चाचा भुर्दंड प्रशासनावर येऊ नये, यासाठी येथील सुविधांसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने यासाठी प्रस्ताव तयार करून जून महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येथील सर्व सुविधा महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत असणार आहेत. खासगी शाळा, क्लब, कार्पोरेट कंपनी यांच्यासाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. मनपा क्षेत्रातील मराठी चित्रपट व मालिकांच्या चित्रीकरणासाठी सकाळी ६ ते सायंकाळी ५ दरम्यान सहा ते आठ हजार रुपये, अमराठी चित्रीकरणासाठी आठ ते दहा हजार रुपये आकारण्यात येणार आहेत. मनपा क्षेत्राबाहेरील मराठी चित्रीकरणासाठी आठ ते १२ हजार रुपये व अमराठीसाठी १२ ते १४ हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई