शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जमिनी संपादन करण्याच्या सिडकोच्या इराद्याने शेतकरी चिंताग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 19:09 IST

सिडको उरण परिसरातील अनेक गावांतील जमिनी संपादित करणार असल्याचा इरादा पक्का केला आहे.

मधुकर ठाकूर 

उरण : सिडको उरण परिसरातील अनेक गावांतील जमिनी संपादित करणार असल्याचा इरादा पक्का केला आहे.सिडकोचा याआधीचा कटू अनुभव पाहता जमिनी संपादन केल्यानंतर शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात मोबदला देईलच याची खात्री नसल्याने   येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.  

 सिडको, महसूल विभागाने नैना, खोपटा शहर, रिजनलपार्क, विरार-अलिबाग कॉरिडॉर आदी विविध प्रकल्पांच्या उभारणीसाठी  जासईपासुन जांभूळपाडा, चिरनेरपर्यत आणि खोपट्यापासुन भेंडखळ, चाणजे, बोकडवीरा, केगाव पर्यंत  इत्यादी गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. जमिनी संपादित करण्यासाठी शेतकऱ्यांना जमिनींच्या मोबदल्यात किती आणि कसा मोबदला देण्याचे कोणतेही धोरण जाहीर केलेले नाही.

 सिडकोने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केलेल्या जमिनींची कोणत्याही प्रकारची विक्री होऊ नये म्हणून ‘७/१२’ वर ‘ सिडको संपादित असा शिक्का लावते. तर काही ठिकाणी जमिनीच्या मोबदल्यात   २२.५ % विकसित भूखंड वाटप करते. यामध्ये प्रत्येक एकरासाठी ६७० चौरस मीटर इतक्या मोजमापाचा भुखंड देण्यात येतो. त्यानंतर बिल्डर सिडकोकडून एनओसी घेऊन असे वितरीत भुखंड शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. मात्र भुखंड खरेदी करताना शेतकऱ्यांना २२.५ %  योजनेअंतर्गत विकसित भूखंड सिडकोला देईल असे बिल्डरने हमीपत्र देणे आवश्यक असताना की तो देत नाही . परिणामी जमीन मालकाला भुखंड विकसित करता येत नाही. 

अशा परिस्थितीत कोट्यावधी रुपये किंमतीचा भुखंड असलेली जमीन मालक प्रकल्प लगतचे गोदाम किंवा इतर विकासकांना जे आपली जमीन ४-१० लाख प्रति गुंठा या दराने विक्री करताना नाहक त्रास होत आहे. ज्या व्यक्तींच्या जमिनी मुख्य रस्ते किंवा प्रकल्पांपासून दूर आहेत आणि त्यांची जमीन विकण्यास असमर्थ आहेत त्यांना फायदा होईल कारण अचानक त्यांच्या जमिनीची मागणी होईल.

शेतकऱ्यांच्या मते जर तुमच्याकडे रस्त्यांवर किंवा कोणत्याही प्रकल्पाला लागून असलेली किमती जमीन असेल तर त्यांनी त्यांची जमीन चांगला मोबदल्यात विक्री करावी  अन्यथा त्यांना नॉन-प्राइम जमिनी इतकीच किंमत मिळेल. शिवाय ७/१२  वरील सिडकोच्या शेऱ्या नंतर सर्व विक्री किंवा भाड्याचे व्यवहार थांबतील अशी शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.