शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो क्षणिक सुखासाठी जमिनी विकू नका; बी. जी. कोळसेपाटील यांचे शेतकऱ्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 12:26 IST

उरण परिसराचा वरवर होणारा विकास हा येथील जनतेला भकास करणारा आहे. जमीन ही काळी आई आहे.

मधुकर ठाकूर 

उरण : उरण परिसराचा वरवर होणारा विकास हा येथील जनतेला भकास करणारा आहे. जमीन ही काळी आई आहे. ती पुन्हा निर्माण होणार नाही. तीला क्षणिक सुखासाठी शेतकऱ्यांनी कवडीमोलाने  विकू नये असे आवाहन माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे- पाटील यांनी शनिवारी उरण येथील एका  जाहीर कार्यक्रमातुन केले.

उरण येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि ५० वर्षातील विविध सामाजिक क्षेत्रातील कामगिरी बद्दल शनिवारी (७) सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.जेएनपीए कामगार वसाहतीतील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सत्काराच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मानव जात एक आहे. तर मग जात, पात, धर्माच्या नावाने माणसा माणसात भेदभाव का ? असा सवालही कोळसे पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी संपत्तीचा अधिकार दिला. तर महात्मा फुले,सावित्रीबाई यांनी शिक्षण दिले. मात्र आज शिक्षणाचे बाजारीकरण व खाजगीकरण करून पुन्हा समाजाला शिक्षणापासून वंचीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजाला गरीब , अशिक्षित , अज्ञानी ठेवून राज्यकर्ते राज्य करीत आहेत. प्रामाणिकपणा हा न भिणारे जीवन  आहे. शिक्षण हे स्वतंत्र विचार करायला शिकवते म्हणूनच माणूस म्हणून जन्माला आलो त्या समाजासाठी जगले पाहिजे, निरपेक्ष भावनेने समाजासाठी काम केले पाहिजे.भारताचे संविधान सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे हक्कासाठी जनशक्ती व अहिंसेच्या मार्गाने  ढण्याचे आवाहनही कोळसे पाटील यांनी केले. 

यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, सुरेश ठाकूर, भूषण पाटील,सुधाकर पाटील,गोपाळ पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, नरेश रहाळकर, ॲड .सुरेश ठाकूर, अनिल जाधव, शाम कुलकर्णी , जीवन गावंड, महेश म्हात्रे आदी मान्यवरांनी विचार व्यक्त केले.