शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कोकण भवनवर धडक देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 06:43 IST

शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास सामाजिक संस्थेने आंदोलन सुरू केले आहे. प्रशासन शेतक-यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने ९ एप्रिलला कोकण भवनवर धडक देण्यात येणार आहे.

पनवेल - शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास सामाजिक संस्थेने आंदोलन सुरू केले आहे. प्रशासन शेतक-यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने ९ एप्रिलला कोकण भवनवर धडक देण्यात येणार आहे.रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास सामाजिक संस्था २३ मार्चपासून धरणे आंदोलन करत आहे. १९६० साली भूसंपादित केलेल्या व प्रकल्पांसाठी न वापरल्या गेलेल्या जमिनी विक्र ी करण्याच्या एकतर्फी निर्णयाच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या पुढील नियोजनाबद्दल माहिती देण्यासाठी पनवेलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेमध्ये माजी आमदार विवेक पाटील, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास सामाजिक संस्थेचे सहसचिव समीर खाने, सल्लागार मोहन देशमुख, सदस्य लक्ष्मण केदारी यांनी पत्रकारांसमोर भूमिका स्पष्ट केली.शेतकºयांची परिस्थिती मांडताना समीर खाने म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने भूसंपादन कायदा १८९४(भाग-१)प्रमाणे बेसिक केमिकल अ‍ॅण्ड इंटरमेडिएट या केंद्र सरकारच्या प्रकल्पासाठी व कामगार वसाहतीसाठी पनवेल तालुक्यातील पोसरी, तुराडे, सावळे, देवळोली व दापिवली आणि खालापूर तालुक्यातील पराडे, आंबिवली व वासंबे या गावांची १६०० एकर जमीन संपादित केली. त्यापैकी ३०० एकरवर एच.ओ.सी. कारखाना, २१० एकरवर एच.ओ.सी. कामगार वसाहत उभारण्यात आली. १९७५ साली ५४० एकर जमीन इतर प्रकल्पांना महाराष्ट्र शासनाने परस्पर दिली. उर्वरित अंदाजे ५५० एकर जागेवर दुबारपिकी, शेती, ग्रामस्थांची घरे, वाडे, वाढीव वसाहती, आदिवासीवाड्या आहेत. कंपनीने न वापरलेली, शेतकºयांच्या ताब्यातील व शेतकºयांच्या उपजीविकेशी निगडित गोष्टी, घरे, वाडे व इतर वसाहती असलेल्या जमिनीचे अवार्ड रद्द करून, ती शेतकºयांना परत मिळावी म्हणून गेली १२ वर्षे शासनस्तरावर चर्चा, बैठका, आंदोलने चालू आहेत. तीन वेळा विधानसभेत रसायनीकरांच्या शेतजमिनी परत कराव्यात, यासाठी प्रश्न उपस्थित करण्यात आले.

टॅग्स :Farmerशेतकरीnewsबातम्या