शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक कर्नाळा किल्ल्याची पडझड; वाड्याच्या भिंती ढासळल्या, प्रवेशद्वार कमान कोसळण्याच्या स्थितीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 07:02 IST

पनवेल येथील कर्नाळा अभयारण्यात वसलेल्या कर्नाळा किल्ल्याची पडझड झाली आहे.  सध्या जोरदार पाऊस तसेच वादळी वाऱ्यांमुळे किल्ल्यावरील वाड्याच्या भिंती ढासळल्या आहेत.

दत्ता म्हात्रेपेण :  पनवेल येथील कर्नाळा अभयारण्यात वसलेल्या कर्नाळा किल्ल्याची पडझड झाली आहे.  सध्या जोरदार पाऊस तसेच वादळी वाऱ्यांमुळे किल्ल्यावरील वाड्याच्या भिंती ढासळल्या आहेत. तसेच लोखंडी रेलिंग वाकल्या आहेत. तसेच प्रवेशद्वार कमान आणि तटबंदी कधीही पडण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे किल्ला धोकादायक होत असल्याच्या कारणास्तव व पर्यटकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने वन विभागामार्फत बंदी घालण्यात आली आहे. या किल्ल्याची वर्षागणिक पडझड होत आहे. बुरुजाला तडे गेले असून किल्ल्यावर जाणाऱ्या वाटेवर काही ठिकाणी दरड कोसळून भूस्खलनही होत असते. यामुळे वन विभागामार्फत पर्यटन व पर्यटकांसाठी किल्ला बंद ठेवण्यात आला आहे. वन विभागाच्यामार्फत येथील वाटा दुरुस्ती करण्याची मागणी पर्यटकांकडून करण्यात येत आहे. राज्य संरक्षित स्मारकात किल्ल्याची नोंद नाही. त्यामुळे या किल्ल्याच्या दुर्ग अवशेषांची तटबंदी, बुरुज, पाण्याच्या टाक्या आणि प्रवेशद्वार यांची डागडुजी शास्त्रशुद्ध पद्धतीने होत नसल्याचा आरोप ट्रेकर्स तसेच विविध सामाजिक संस्था करीत आहेत. सह्याद्री प्रतिष्ठानकडून पाठपुरावासह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेकडून हा किल्ला संरक्षित स्मारकात नोंद व्हावी म्हणून राज्य पुरातत्त्व विभागाकडे एप्रिल २०१८ पासून पत्रव्यवहार सुरू आहे. पुरातत्त्व विभागामार्फत किल्ल्यावर अधिसूचना लावण्यात आली. परंतु अधिसूचनेची मुदत संपल्यानंतर अद्याप कोणतेही कारवाई झाली नाही. वन विभागालादेखील या संदर्भातील पत्रे देण्यात आली होती. संस्थेमार्फत किल्ल्यावर सागवानी प्रवेशद्वार लावण्यात आले आहे. स्वच्छता मोहिमाही राबविल्या जात आहेत.

रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध  कर्नाळा किल्ल्याच्या संवर्धनासाठी वन विभाग आणि राज्य पुरातत्त्व विभागाने तत्काळ लक्ष द्यावे. - रोशन टेमघेरे, सह्याद्री प्रतिष्ठान सदस्य,  पेण विभाग

कर्नाळा किल्ल्याचे अवशेष धोकादायक स्थितीत असल्याने किल्ल्यावर जाण्यासाठी प्रवेश बंदी केली आहे.सुरक्षा प्रंबध व पर्यटकांच्या जीवाला धोका पोहोचू नये ही जीवितहानी टाळण्यासाठी किल्यावर जाण्यासाठी बंदी आहे.किल्ला पायथ्याशी व इतरत्र बंदी नाही.या ठिकाणी सुरक्षेसाठी वनरक्षक जातीने ड्यूटी कर्तव्य बजावत आहेत..-  नारायण राठोड, वनक्षेत्रपाल कर्नाळा अभयारण्य पनवेल वनविभाग

टॅग्स :Fortगड