शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘जेटी’साठी बनावट कागदपत्रांचा आधार

By admin | Updated: May 3, 2017 05:53 IST

शहाबाज धरमतर येथे जेटी बांधण्यासाठी बनावट कागदपत्रांचा आधार घेतला होता. याप्रकरणातील आरोपींवर गुन्ह्याची

अलिबाग : शहाबाज धरमतर येथे जेटी बांधण्यासाठी बनावट कागदपत्रांचा आधार घेतला होता. याप्रकरणातील आरोपींवर गुन्ह्याची प्रक्रि या (इश्यू प्रोसेस) सुरू करण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाच्या मुख्य न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी दिले आहेत, अशी माहिती या प्रकरणातील तक्रारदार शेतकरी द्वारकानाथ पाटील आणि दर्शन जुईकर यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेमध्ये दिली.महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मोरा बंदरे समूहाचे तत्कालीन प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन पंकज भटनागर यांच्या सहीची बनावट कागदपत्रे बनवण्यात आली होती. बंदर उद्योगासाठी अनधिकृत जेट्या आणि त्याच बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेकडून सुमारे ५६ कोटी रु पयांचे कर्ज मिळवले होते. याबाबत रायगड जिल्हा न्यायालयात शेतकरी द्वारकानाथ पाटील आणि दर्शन जुईकर यांनी फिर्याद दाखल केली होती. त्यामुळे मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी आ.जयंत पाटील, नृपाल पाटील, तत्कालीन प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन पंकज भटनागर यांच्याविरुद्ध गुन्ह्याची प्रक्रि या (प्रोसेस इश्यू) सुरू करण्याचे आदेश जारी केल्याचे द्वारकानाथ पाटील यांनी सांगितले.पी.एन.पी.कंपनीने मेरीटाईम बोर्डास २००६ मध्ये जी कागदपत्रे सादर केली त्यामध्ये मेरीटाईम बोर्डाचे २४ फेब्रुवारी २००४ चे पत्र जोडले आहे. कंपनीने जेटीचे नकाशे प्रमाणित करून या पत्रासोबत जोडलेले होते. या सर्व प्रतींवर बंदर अधिकारी मोरा बंदरे समूह यांची सही, त्यांच्या कार्यालयाची शासकीय मुद्रा दिसून येते, असे मुंबईमधील विधिज्ञ अ‍ॅड.आशिष गिरी यांनी सांगितले. माजी आमदार मधुकर ठाकूर यांना याबाबत संशय वाटल्याने त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. तत्कालीन बंदर अधिकारी पंकज भटनागर यांनी त्यांचा खुलासा १० जानेवारी २००७ आणि १५ नोव्हेंबर २००७ अन्वये महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे सादर केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे मी धरमतर येथे जेटी बांधण्यासाठी कोणतीही परवानगी दिली नव्हती. तशी परवानगी देण्याचा मला अधिकार नव्हता. या नियमाची बंदर अधिकारी म्हणून मला पूर्ण माहिती होती, असा कबुली जबाब मेरीटाईम बोर्डाकडे सादर केल्याचेही अ‍ॅड. गिरी यांनी स्पष्ट केले. पीएनपीविरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी वारंवार सरकारकडे के ली होती, परंतु काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. (प्रतिनिधी)