शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

बनावट नोटा चलनात आणण्याचा डाव उधळला, १० हजार रुपयांसह एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 04:18 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये बनावट नोटा चलनात आणण्याचा डाव दक्ष व्यापारी व पोलिसांनी उधळवून लावला आहे.

नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये बनावट नोटा चलनात आणण्याचा डाव दक्ष व्यापारी व पोलिसांनी उधळवून लावला आहे. अँटॉप हिलमधील भाजीविक्रेता आलम शेखला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून दोन हजार रुपये किमतीच्या पाच नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.भाजी मार्केटमधील गाळा नंबर १६९मध्ये मोहम्मद हरिष रावडर हे आले विक्रीचा व्यवसाय करत आहेत. गुरुवारी सकाळी अँटॉप हिलमधून आलम रहीम शेख (३२) हा आले विकत घेण्यासाठी आला होता. माल खरेदी केल्यानंतर त्याने दोन हजार रुपयांची नोट दिली. रावडर यांना ती नोट बनावट असल्याची शंका आल्याने त्यांनी खरेदीदारास तसे सांगितले; पण आलमने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केल्यामुळे मार्केटमधील व्यापारी एकत्र आले व त्यांनी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने एपीएमसी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आलमला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन हजार रुपये किमतीच्या एकूण पाच नोटा आढळून आल्या. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडे चौकशी केली असता भिसीमध्ये हे पैसे मिळाले असून त्यातून भाजी खरेदी करण्यासाठी आलो असल्याची माहिती दिली.मार्केटमध्ये बनावट नोटा देऊन भाजी खरेदी करणाऱ्या अँटॉप हिलमधील एक व्यक्तीस अटक केली आहे. त्याने या नोटा कोणाकडून आणल्या व अजून या गुन्ह्यामध्ये कोणाचा समावेश आहे का? याचा तपास सुरू आहे.- सतीश निकम,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एपीएमसीभाजी मार्केटमध्ये सकाळी एक खरेदीदाराने दोन हजार रुपये किमतीची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न केला. व्यापाºयाच्या दक्षतेमुळे हा प्रकार निदर्शनास आला असून, आम्ही संबंधिताला तत्काळ पोलिसांच्या हवाली दिले आहे.- कैलास ताजणे,अध्यक्ष,भाजीपाला महासंघ 

टॅग्स :Crimeगुन्हाNavi Mumbaiनवी मुंबई