शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

फावल्या वेळेत रील्स बनविणे नडले, पालिकेच्या ५ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 10:26 IST

Panvel: पनवेल महापालिकेत कर्तव्यावर असताना फावल्या वेळेत रील्स बनविणे ६ कर्मचाऱ्यांच्या अंगलट आले आहे. कार्यालयीन वेळेत व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर प्रसिद्ध करणाऱ्या ५ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आयुक्त गणेश देशमुख यांनी निलंबन केले.

पनवेल - पनवेल महापालिकेत कर्तव्यावर असताना फावल्या वेळेत रील्स बनविणे ६ कर्मचाऱ्यांच्या अंगलट आले आहे. कार्यालयीन वेळेत व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर प्रसिद्ध करणाऱ्या ५ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आयुक्त गणेश देशमुख यांनी निलंबन केले.

पालिकेत एका प्रायव्हेट लिमिटेड कंत्राट कंपनीकडून मनुष्यबळ पुरविले जाते. या कंत्राटदारामार्फत भरती केलेल्या कर्मचाऱ्यांचे इन्स्टावर अनेक व्हिडीओ झपाट्याने व्हायरल झाले. यामध्ये एका कायमस्वरूपी कर्मचाऱ्याचादेखील समावेश आहे. व्हायरल होत असलेले व्हिडीओ पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनादेखील प्राप्त झाले. त्यांनी तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश उपायुक्त कैलास गावडे यांना दिले. त्यानुसार रिल्समध्ये सहभाग असलेला महेंद्र ठाकूर, आश्विनी नानासो हजारे, सुनीता सुजित नाईक, सुलोचना गडहिरे, अमर नाईक हे पाच कंत्राटी कामगार डेटा इन्ट्री ऑपरेटर आहेत.

कारणे दाखवा नोटीस पालिकेत कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून लिपिक पदावर काम करणारे आकाश केणी यांचा सहभाग होता.  कंत्राटी कामगारांचे थेट निलंबन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून लिपिक आकाश केणी याला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत कारणे दाखवा नोटीस दिली आहे. 

कर्मचाऱ्यांची गैरवर्तणूक खपवून घेतली जाणार नाही. कर्मचाऱ्यांनी नियमात आणि शिस्तीत काम केलेच पाहिजे. अशा प्रकारे व्हिडीओ बनवून प्रसारित करणे म्हणजे पालिका प्रशासनाच्या कामकाजावर गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे. यामुळे तत्काळ या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.- गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका

टॅग्स :panvelपनवेलRaigadरायगड